राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ येवल्यात 'जोडे मारो' आंदोलन

राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ येवल्यात 'जोडे मारो' आंदोलन

येवला | प्रतिनिधी | Yeola

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या बद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी अपशब्द वापरून महाराजांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ शिवसेना येवला तालुक्याच्या वतीने राज्यपालांच्या फोटोला चपलेने जोडे मारीत निषेध आंदोलन करण्यात आले...

तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संभाजी राजे पवार, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरनारे, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी आदींच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक व शिवप्रेमींनी हातात भगवे झेंडे घेऊन राज्यपालांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत विविध घोषणा देऊन तहसील परिसर दणाणून सोडला.

राज्यपाल यांना ताबडतोब महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवावे. राज्यपालांनी वारंवार वादग्रस्त विधान करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला आहेत. यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावलेले आहेत.

राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ येवल्यात 'जोडे मारो' आंदोलन
तारक मेहता फेम 'बबिता'चा अपघात

भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत की भाजपचे? असा प्रश्न करीत ते एकट्या भाजपचे पदाधिकारी असल्यासारखे वागतात, त्यांच्या या बाबींचा निषेध करत त्यांनी ताबडतोब महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार प्रमोद दिले यांच्याकडे निवेदन देऊन केली.

राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ येवल्यात 'जोडे मारो' आंदोलन
भीषण अपघात! एक दोन नव्हे तर तब्बल ४८ गाड्या एकमेकांवर आदळल्या

यावेळी महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सुमित्रा बोटे, शहरप्रमुख दिपाली नागपुरे, माजी सभापती प्रवीण गायकवाड, पुंडलिक पाचपुते, माजी जि प सदस्य बाळासाहेब पिंपरकर, ज्येष्ठ शिवसैनिक किशोर सोनवणे, चंद्रकांत शिंदे, अमोल सोनवणे, अशोक आव्हाड, दीपक जगताप, राहुल लोणारी, संजय कासार, ज्ञानेश्वर दोडे, मनोज रंधे, खंडू साताळकर, हरिभाऊ साळुंखे, रवींद्र वाकचौरे, किरण ठाकरे, मकरंद तक्ते ,मोहफिज अख्तार, प्रशांत जाधव, वाल्मीक गायकवाड, शोभा जाधव, कमलाबाई दराडे, रंगनाथ भोरकडे, वाल्मीक गायकवाड, किसन बोटे आदी विविध पदाधिकारी शिवसैनिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com