समाजकल्याण विभागात लाच स्विकारताना एजंट गजाआड

समाजकल्याण विभागात लाच स्विकारताना एजंट गजाआड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक येथील समाज कल्याण कार्यालयात एका एजंटला ६० हजार रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले आहे. (Sixty thousand rupees bribe case) याबाबतच्या वृत्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (anti corruption bureau nashik) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. ५० ते ६० हजारांची रक्कम या व्यक्तीने तक्रारदाराकडून स्वीकारली असल्याचे समोर येत आहे...

तक्रारदाराचे काम मार्गी लावून देण्यासाठी आपल्या वरच्या पातळीवर ओळखी असल्याचे या एजंटने सांगितले होते. या कारवाईदरम्यान एजंट हा चालकदेखील असल्याचे समजते. त्याने यावेळी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेतल्याचे समजते आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com