नाशिकमध्ये 'या' वयोगटातील २८ हजार पुरुष, १६ हजार महिलांना करोनाची लागण

नाशिकमध्ये 'या' वयोगटातील २८ हजार पुरुष, १६ हजार महिलांना करोनाची लागण

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील करोना संसर्ग वेगाने होत असतांना बाधीतांना खाटा मिळणे अवघड झालेले असल्याने अनेक जण मृत्युच्या दाराशी जाऊन ठेपले आहे. हा संसर्ग वाढीसंदर्भात झालेल्या अभ्यासातून शहरातील तरूण मंडळी यास कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.

यात 21 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्ती कामानिमित्त बाहेर पडतांना मास्क वापर, सामाजिक अंतर नियम व सॅनिटाईजरची वापर याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळेच शहरात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर आली आहे...

शहरात मागील वर्षात झालेल्या करोना संसर्गात देखील तरुण मंडळीच करोना वाहक ठरल्याची बाब समोर आली होती. शहरातील झोपडपट्टी व अरुंद गल्ल्या असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग झाल्याचे मागील वर्षात समोर आले होते.

यात पंचवटीतील पेठरोड - दिंडोरी भागाती झोपडपट्टी व नवीन नाशिक भाग याठिकाणी सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आले होते. या भागात विशेषत: तरूण वर्ग कामानिमित्त बाहेर पडत असुन उदरनिर्वाहाच्या निमित्ताने बाहेर पडतांना करोना टाळण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाही.

याचाच परिणाम म्हणुन पंचवटीतील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीनंतर शेजारील झोपडपट्टीत करोनाचा मोठा प्रादुर्भाव होऊन अनेकांचा बळी गेला होता. आता करोनाच्या दुसर्‍या लाटेत देखील नवीन नाशिक भागात सर्वाधिक म्हणजे 38 हजार 850 रुग्ण आढळून आले असुन दुसर्‍या क्रमांकावरील रुग्ण पंचवटी विभागात 35 हजार 39 इतके रुग्ण आढळले आहे. याचा अर्थ शहरातील करोना संसर्गाची स्थिती गत वर्षाप्रमाणेच आहे.

शहरातील 21 ते 30 वर्षावरील युवक मंडळी वेगवेगळ्या कामानिमित्त, व्यावसाय, फिरस्ती विक्री व इतर व्यावसायाच्या निमित्ताने बाहेर पडतात. तर बेरोजगार असलेले युवक मित्रमंडळीसमवेत बिनधास्त फिरत असतात.

यात यामंडळीकडुन मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळता जवळ बसणे, सॅनिटाईजरचा वापर किंवा वारंवार हात स्वच्छ करणे याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही मंडळी करोनाला बळी पडली आहे. याचा मोठा फटका त्यांच्या कुटुंबियांना बसला असुन यातून काही जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

अशीच स्थिती 31 ते 40 वर्ष वयोगटातील आहे. त्यांच्याकडुन देखील नियमांचे पालन केले जात नसुन त्यांच्या निष्काळजीचा फटका त्यांच्या कुटुंबियांना बसत आहे. यात काही घरातील कर्ती मंडळीचा मृत्यु झाला असुन कुटुंब पोरके झाले आहे.

या वयोगटातील मंडळीकडुन शहरात करोना वाहकाचे काम होत असल्याने आता याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. राज्य शासनाने लादलेल्या निर्बंधात पोलीसांकडुन या वयोगटातील मंडळींना लगाम लावण्याची गरज आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com