आगर टाकळी परिसरात एकावर धारदार शस्राने वार

आगर टाकळी परिसरात एकावर धारदार शस्राने वार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

उपनगर परिसरात (Upnagar Area) राहणाऱ्या ३० वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला (Attack on youth) झाल्याची घटना घडली आहे. इरफान हुबे शेख (रा. नारायण बापू नगर टाकळी रोड नाशिक) असे जखमी युवकाचे नाव आहे...

अधिक माहिती अशी की, आगर टाकळी गाव (Agartakali gaon) परिसरात आरजे o9 एसएक्स 3992 मोटर सायकल मिळून आली. यावरून माहिती घेतली असता प्रथमदर्शनी जखमी इरफान शेख (Irfan Shaikh) याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या महिलेच्या पतीला आगळ टाकळी गाव येथील उसाच्या शेताजवळ त्याची पत्नी व इरफान शेख मिळून आले होते.

याच वेळी महिलेच्या पतीने त्याच्या साथीदारांच्यासोबत इरफानच्या गळ्यावर सुरा मारून त्यास गंभीर जखमी केले. काल (दि०३) रात्री 20.00 वाजेच्या सुमारास घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी इरफानला स्थानिक नागरिकांनी प्रथम जिल्हा रुग्णालयात व त्यानंतर पुढील उपचाराकरता डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज (Dr Vasantrao pawar medical college) येथे दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com