महसूल सेवक मुख्यालय सोडण्याच्या विरोधात

महसूल सेवक मुख्यालय सोडण्याच्या विरोधात

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector's Office) वर्ग डच्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan d.) आहे. मात्र गेल्या 10 वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचार्‍यांनी बदली आदेश येण्यापूर्वीच मुख्यालय सोडण्याच्या कारणविरोधात गेले आहे.

महसूलमधील (Revenue) विविध पदांच्या बदल्यांची प्रक्रिया राज्यस्तरावर सुरू झाली आहे. यातच वर्ग-ड च्या बदल्या 31 मेपूर्वी करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला असून बदली आदेशापूर्वीच मुख्यालय सोडण्याच्या कारण विरोधात शिपाई गेले आहे. त्यांनी मॅटच्या नियमाचा आधार घेतला आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनाही शिपायांच्या बदल्या करताना मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वर्ग-अ, ब, क या पदांना बदल्यांचा कालावधी तीन वर्षांचा निश्चित केला आहे. परंतु, वर्ग-डच्या बदलीसाठी कालावधी निश्चित नाही. त्यामुळे या गटातील कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी सेवा देत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक शिपाई 10 वर्षांपासून कार्यरत असल्याचे देत जिल्हाधिकार्‍यांनी बदलीचा निर्णय घेतला. यानुसार काहींना मुख्यालय सोडून तालुक्यांना पाठविण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com