महामार्गावर पुन्हा 'त्याच' वळणावर अपघात

महामार्गावर पुन्हा 'त्याच' वळणावर अपघात

सिन्नर । वार्ताहर Sinnar

नाशिक-पुणे महामार्गावर Nashik-Pune Highway नांदूरशिंगोटे Nandurshingote परिसरात हॉटेल साई सोनाईसमोर Hotel- Sai- sonai असलेल्या वळणावर अज्ञात चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना Accident काल दुपारी 3 च्या सुमारास घडली. या धोकादायक वळणावर गतीरोधक टाकण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असली तरी महामार्ग प्रशासना कडून लक्षघातले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पुणेकडून नाशिककडे जाणार्‍या अज्ञात ट्रक या वळणावरुन भरधाव वेगाने जाताना पुढे चालणार्‍या दुचाकी क्र. एम. एच. 14/ एफ. ए. 224 ला धडक देऊन निघून गेली. यामुळे दुचाकीवरील दोन तरुणांसह एक महिला गंभीर जखमी झाले. सुदैवाने दुचाकी चालकाने दुचाकी दुभाजकाकडे वळवल्याने तिघेही दुभाजकावर जाऊन पडले. मात्र, या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला.

यावेळी स्थानिकांनी मदत करत रुग्णवाहिकेला पाचारण केले व त्या युवकांसह महिलेस उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघाती वळणावर अपघाताचे सत्र नित्याचेच झाले असले तरी महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. अनेक वेळा महामार्ग व्यवस्थापनाचे अधिकारी दिलीप शिंदे यांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून पत्रव्यवहार करुन देखील यावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या वळणावर बायपास सुरू होत असून गावात जाण्यासाठीही या ठिकानाहूनच रस्ता फुटतो. या ठिकाणी नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतात. यामध्ये अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. या वळणावर गती रोधक नसल्याने रस्ता पार करताना काळजात धडकी भरत असते. वाहनचालकांनाही याचा अंदाज येत नसल्याने तेही भरधाव वेगाने येथून जात असतात.

दुभाजकातील झाडे जळाली

सदरचे वळण हे अंत्यंत्य धोकादायक असून दुभाजकातील झाडांमुळे रस्ता ओलांडताना समोरुन येणारी वाहने दिसतच नाही. स्थानिकांनी अनेक वेळा झाडे कट करणार्‍या ठेकेदाराला सांगुनही झाडांची वेळेवर कटींग होत नसल्याने ही झाडे मोठ्या प्रमाणावर वाढतात. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत असते. मात्र, सततच्या अपघाताला कंटाळून येथील स्थानिकांनी दुभाजकातील झाडेच दोन दिवसांपूर्वी जाळून टाकली आहेत.

गतीरोधक बसवा अन्यथा आंदोलन

अनेकदा महामार्गाच्या प्रकल्प संचालकांना पत्रव्यवहार करुनदेखील गतीरोधक टाकण्याबाबत कानाडोळा होत आहे. नित्याच्या अपघातामुळे आम्हालाही त्रास सहन करावा लागतो. रोज डोळ्यासमोर कित्येकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे आता तात्काळ यावर तोडगा न काढल्यास महामार्गावर आंदोलन करण्यात येईल.

जगन शेळके, स्थानिक हॉटेल व्यावसायिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com