Corona
Corona
नाशिक

उमराणे : पुन्हा एक अहवाल पॉझिटिव्ह

आरोग्य यंत्रणेच्या सुचना व नियमांचे सर्वांनी पालन करावे -विलास देवरे

Abhay Puntambekar

उमराणे । वार्ताहर Umrane

उमराणे येथील गणपती मंदिर परिसरातील ७६ वर्षीय वृध्द महिलेचा स्त्राव अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान आल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा चिंतेचे सावट पसरले आहे. सदर बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तीयांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहे.

दहा दिवसापुर्वी तीन बाधीत रूग्ण आढळून आले होते. यापैकी दोघे करोनामुक्त झाल्याने त्यांची घरवापसी झाली होती. त्यामुळे गावातून करोना हद्दपार होत असल्याचे चिन्ह निर्माण झाले असतांनाच पुन्हा ७६ वर्षीय वृध्दा बाधीत निघाल्याने ग्रामस्थ चिंताक्रांत झाले आहेत.

आरोग्य यंत्रणेच्या सुचना व नियमांचे सर्वांनी पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन माजी सभापती विलास देवरे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com