नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने तीन दिवसात ८०० ते एक हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.तर अनलाॅकनंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट होत असून ५८ हजार प्रति तोळापर्यंत गेलेले दर आता ४८ हजार रुपये तोळापर्यंत घसरले आहेत. सध्या लग्नसराईचा सिजन असुन नागरिकांकडून जोरदार सोन्याची खरेदी सुरु आहे.

करोना संकट व लाॅकडाऊन काळात सोन्याच्या दराने उच्चांकी गाठली होती. मात्र दिवाळीनंतर सोन्याचे दर उतरणीला लागले आहे. सोने आणि चांदीच्या दरातील घसरण सातत्याने सुरूच आहे. अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात झाल्यानंतर सोन्याचे दर तीन दिवसात ८०० ते १००० रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर किलोमागे ७ हजाराने घसरले आहेत. अर्थसंकल्पापूर्वी, सोमवारी चांदीचे दर ७४ हजार प्रती किलो होते. तेच दर ६८ हजारांपर्यत खाली आले आहेत.

त्यामुळे चोख सोन्यात गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. जागतिक बाजारात साने, चांदीच्या दर घसरणीचा परिणाम देशातील सोने-चांदीच्या दरावर झालेला आहे. अर्थसंकल्पामध्ये सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी केले आहे.

हे दर अजून कमी होण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तवली आहे. सोन्याचे घसरलेल्या दराचा ग्राहकांकडून फायदा घेतला जात असून लग्नसराईचा सिजन असल्याने जोरदार खरेदी पहायला मिळत आहे.

गुंतवणुकदारांची निराशा

आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे चांदीचे दर कमी होत आहेत. त्यामुळे सोने, चांदीचे खरेदी करावे की नाही, यासाठी ग्राहक देखील संभ्रमात पडलेले आहेत. शेअर बाजार मागील काही दिवसांपासून उच्चांकी पातळी गाठत असल्याने गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळत अाहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत.

सोन्याचे दर (प्रती तोळा,जीएसटीसह)

१ फेब्रु. 49,650

२ फेब्रु. 48,000

३ फेब्रु. 48,900

चांदीचे दर (प्रती किलो, जीएसटीसह)

१ फेब्रु 74,000

३ फेब्रु 68,000

४ फेबु् 67,000