दोन वर्षांनंतर घुमणार ढोलताशांचा दणदणाट

दोन वर्षांनंतर घुमणार ढोलताशांचा दणदणाट

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

कोणत्याही मिरवणुकीत नाशिक ढोल ( Nashik Dhol ) म्हटले की अनेकांचे पाय थिरकायला लागतात. नाशिक शहरासह परिसरातील तब्बल 50 ते 55 ढोलताशा वाद्य पथकांचा सराव शहरासह शहराबाहेरील विविध लॉन्स व मोकळ्या जागी सुरु असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.

गणेशाच्या आगमनासह विसर्जन मिरवणुकांमध्ये या पारंपरिक वाद्यांचा दणदणाट करण्यासाठी या ढोलताशांचा सराव अंतिम टप्प्यात आला आहे.गेले दोन वर्ष करोनामुळे गणेशोत्सव पाहिजे तसा साजरा करण्यावर मर्यादा होत्या. त्यात मिरवणुकांवर बंदी असल्याने पारंपरिक वाद्यांच्या गजर देखील करता आला नव्हता.

गणेशोत्सवादरम्यान डॉल्बीच्या आवाजावर यंदाही निर्बंध घातले असून या पारंपरिक ढोलताशा पथकांना मागणी जोरदार असणार आहे. त्यामुळे काहींची आगाऊ बुकिंग झालेली असताना गेल्या दीड दोन महिन्यांपासून नवीन लय, ठेका व ताल शिकण्यासाठी तर काही नवीन सदस्यांना प्रशिक्षित करण्यासाठी बहुतांश ढोलताशा पथकातील तरुणाई या सरावातून मेहनत घेत आहे. पथकातील सदस्य नियमित दिनक्रम पूर्ण करून सायंकाळच्यावेळी सराव करण्यास प्राधान्य देत आहे.

पथकात साधारण 8 वर्षे वयोगटापासून ते 40 वर्ष वयोगटाप्रमाणे शंभर ते दोनशेपेक्षा अधिक सदस्यांचा सहभाग असतो. नाशिक शहरात व शहराबाहेरील बंदिस्त लॉन्सवर किंवा मोकळ्या जागेवर काही पथके दोन महिन्यांपासून सराव करत असल्याचे मेघनाद ढोलताशा पथकाच्या संचालकांनी सांगितले आहे. एक ते पाच असे पारंपरिक ताल असतात. याला पारंपरिक हात चालवणे असे संबोधले जाते.

आता गणेशोत्सव( Ganesh Festival ) तर आगामी नवरात्रोत्सव ( Navrati Festival )मिरवणूक, विविध जयंती, पाडवा अशा विविध सणांना ढोलताशा पथकांची मागणी असते. गेल्या काही वर्षांत ढोल पथकांत महिला व मुलींची लक्षणीय उपस्थिती दिसून येते. शारीरिक व्यायाम म्हणूनही ढोल पथकाकडे आकर्षित होण्याचे प्रमाण वाढले आहे. निर्बंध हटवल्यानंतर आता पुन्हा आगामी सण उत्सवांत या ढोलताशांचा दणदणाट घुमणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com