
विंचूर। वार्ताहर | Vinchur-Niphad
विंचूर (vinchur) स्मशानभूमीतील (Cemetery) अतिक्रमण (Encroachment) काढून ताबा घेण्यासाठी येथील सन्मित्र ज्येष्ठ नागरिक संघाचे (Senior Citizens Association) ग्रामपालिकेसमोर सुरू असलेले लाक्षणिक उपोषण (hunger strike) सरपंचांच्या लेखी आश्वासनाने मागे घेण्यात आले.
येथील स्मशानभूमीच्या जागेवर विटभट्टीचे झालेले अतिक्रमण काढण्यासाठी सन्मित्र ज्येष्ठ नागरिक संघाने न्यायालयीन लढाई बरोबरच प्रशासकीय स्तरावर पत्र व्यवहार करुन अतिक्रमण (Encroachment) काढण्याचे आदेश मिळविले आहेत. मात्र ग्रामपालिकेकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याने ज्येष्ठ नागरिक ग्रामपालिकेसमोर लाक्षणिक उपोषणास बसले होते.
उपोषण कर्त्यांना ग्रामपालिकेच्या वतीने सरपंच सचिन दरेकर व निफाड पं.स. चे ग्रामविस्तार अधिकारी एस.के. सोनवणे यांनी एक महिन्यात स्मशानभूमीच्या अतिक्रमित जागेचा ताबा घेऊ व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ असे लेखी आश्वासन देण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणकर्ते व ग्रामपालिका यांच्यात गंगाधर गोरे, सुनील मालपाणी यांनी मध्यस्थी केली व उपोषण कर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.
सन्मित्र ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामनाथ दरेकर, शरद महाजन, मुरलीधर निकाळे, धोंडीराम शंखपाळ, गोपीनाथ खैरे, भास्कर दरेकर, प्रल्हाद पगारे, भाऊसाहेब संधान, अमीन मोमीन, दिलीप साळुंके, शांंताराम कुसळकर, शिवाजी दरेकर आदी उपोषणास बसलेले होते.
याप्रसंगी ग्रामपालिका सदस्य दिलीप चव्हाण, दत्तात्रय व्यवहारे, बाळासाहेब चव्हाण, किशोर जेऊघाले, बाळासाहेब साळुंके उपस्थित होते. स्मशानभूमीतील अतिक्रमण काढले नाही तर पुन्हा त्याबाबत ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने उपोषण करण्यात येईल असेही यावेळी सन्मित्र ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कळविण्यात आले आहे.