रिलायन्सनंतर अक्राळेत इंडियन ऑइल उभारणार उद्योग

दिंडोरी परिसरात रोजगाराच्या संधी वाढणार
रिलायन्सनंतर अक्राळेत इंडियन ऑइल उभारणार उद्योग
USER

सातपूर | Satpur

नाशिक(Nashik), सातपूर (Satpur), अंबड(Ambad), सिन्नर (Sinnar) औद्योगिक वसाहतीत भूखंड उपलब्ध होत नसली तरी दिंडोरी-अक्राळे (Dindori) येथील भूखंडाच्या दराबद्दल उद्योजकांची तक्रार असल्याने मागणी होत नव्हती मात्र मागील आठवड्यात रिलायन्स उद्योग समूहाने (Reliance Groups) भूखंड आरक्षित केले.

पाठोपाठ इंडियन ऑइल उद्योग (Indian Oil) समूह याठिकाणी मुहूर्तमेढ रोवत आसून येत्या दोन दिवसात घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आक्राळे औद्योगिक वसाहत (Akrale Industrial Area) आता खऱ्या अर्थाने गजबजू लागणार असल्याचे चित्र आहे.

नाशिक औद्योगिक क्षेत्राच्या (Nashik Industrial Area) विस्तारासाठी अक्राळे दिंडोरी येथे साडे पाचशे एकर क्षेत्र विकसित करण्यात आले. सुरुवातीच्या काळात या भागाला फारशी मागणी नसते, नव्हती मात्र रिलायन्स उद्योगसमूहाने याठिकाणी उद्योग उभारणीस प्रारंभ केल्याने या भागातील हालचाली गतिमान झाल्याचे दिसून येत आहे.

रिलायन्स उद्योग समूह या पाठोपाठ इंडियन ऑइल उद्योग समूह देखील अक्राळे येथील भूखंडाची चाचणी करीत आहे. शासकीय स्तरावरून चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असून येत्या एक-दोन दिवसात इंडियन ऑइल उद्योगसमूहांची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. त्यामुळे अक्राळे दिंडोरी या औद्योगिक क्षेत्रासाठी लवकरच छोट्या उद्योगाचे मोठे जाळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी विभागातील आमदार व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (MLA Narhari Zirwal) यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मोठे उद्योग स्थिरावणे शक्य झाले आहे.

यासाठी मात्र आयमा (IMA) चे उपसमिती अध्यक्ष मनीष रावल व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे (NCP Ranjan Thakarey) यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या उपक्रमाला गती मिळाली आहे. परिसरातील लघुउद्योगांना खऱ्या अर्थाने व्यवसाय संधी वाढल्याने उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com