माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाची परवड

प्रभारी पदभार कदम यांच्याकडे
माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाची परवड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील शिक्षकांकडून माध्यमिक शिक्षण विभागाच्या Department of Secondary Education कामकाजाबद्दलच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेत प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी Secondary Education Officer in charge पुष्पावती पाटील Pushpavati Patil यांच्याकडून प्रभारीपदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. नंदुरबारचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे.

हा पदभार देत असताना विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपासून कदम यांच्यासह धुळे व जळगाव शिक्षणाधिकारी हे नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांच्या कामकाजाची चौकशी करत असतानाच कदम यांच्याकडे पदभार देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कदम हे सोमवारी (दि.1) माध्यमिकचा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.

माध्यमिक शिक्षणाधिकारी झनकर यांना आठ लाखांची लाच घेतांना अटक झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर या खुर्चीवर बसण्यासाठी अनेक अधिकार्‍यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. अनेकांनी मुंबई दरबारी उंबरे झिजविल्याची चर्चा होती. मात्र, अजूनही कोणाचीच नियुक्ती येथे झालेली नाही.

माध्यमिकचा पदभार हा शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक शिक्षण संचालक पुष्पावती पाटील यांच्याकडे 24 ऑगस्ट 2021 रोजी सोपविण्यात आला होता. मात्र, पाटील माध्यमिक विभागात येत नसल्याच्या शिक्षकांच्या तक्रारी होत्या. वेतना व्यातिरिक्त इतर फाईल काढल्याच नाही. त्यामुळे फाईल पेंडन्सी दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली होती. मागील आठवडयात मुख्याध्यापकांच्या झालेल्या सहविचार सभेत पाटील यांच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यात आले.

पाटील यांच्या कामकाजाबाबत नाराजी वाढत असल्याने त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्याची चर्चा आहे. या पदाचा पदभार नंदुरबार माध्यमिक शिक्षणाधिकारी कदम यांच्याकडे देण्यात आला आहे. कदम दोन दिवसांपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या आदेशान्वयेच माध्यमिक विभागाच्या कामकाजाची तपासणी करत होते. यात झनकर यांच्या फाईलींवर लक्ष केंद्रीत करत तपासणी सुरू असल्याने ही तपासणी वादात सापडली होती. यातच कदम यांच्याकडे पदभार आल्याने शिक्षकांना न्याय मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पथकाकडून तपासणी

शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून आलेल्या पथकांकडून दोन दिवसांपासून माध्यमिक शिक्षण विभागाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी (दि.29) शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या पथकाने माध्यमिक विभागात येऊन तापसणी करत कामकाजाबाबत उलट तपासणी केली. या पथकाने प्राथमिक शिक्षण विभागात देखील भेट देऊन तपासणी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com