file photo
file photo
नाशिक

आई ! मला शाळेत जायचंय, जाऊदे नवं...

ग्रामीण विद्यार्थ्यांची परवड

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर | गोकुळ पवार

शाळा सुरू होण्याबाबत अद्यापही शासनाकडून निर्णय घेण्यात आला नसला तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असल्याने येथील विद्यार्थी 'आई, मला शाळेला जायचंय, जाऊ दे नवं' अशी साद घालतांना दिसत आहेत.

राज्यात अद्यापही कोरोना कहर सुरूच असून काहीअंशी ग्रामीण भागात याचा फैलाव कमी होतांना दिसून येत आहे. अशातच शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना स्टडी फ्रॉम होम करावा लागत आहे. यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन, शाळा व्यवस्थापन यांच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेस शहरी भागात चांगला प्रतिसादही मिळून येत आहे. परंतु ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाची बिकट वाट झाली आहे.

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवर्क, स्मार्टफोनच्या अडचणी असून अनेक पालकांना मोबाईल कसा हाताळावा हे देखील माहीती नसल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतांना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या पालकांना ‘बाबा मला शाळेला जायचं’म्हणताना दिसून येत आहे.

आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी गरीब सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांला स्मार्ट फोन घेणे अशा बिकट परिस्थितीत कठीण जात आहे. तर अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने या विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे हा प्रश्न पालकांना सतावत आहे. तर अनेक शिक्षक पुढाकार घेऊन गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आॅफलाईन शिक्षण देत आहेत. असाही प्रयोग ग्रामीण भागात होणे गरजेचे आहे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

सध्या गावातून शिक्षित तरुण पुढे येऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करीत आहेत. अशावेळी शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- तानाजी महाले, पालक

आमचे पालक अडाणी असल्याने मिळालेल्या पाठ्यपुस्तकावर आम्हालाच अभ्यास करावा लागत आहे. स्मार्ट फोन नसल्याने शिक्षकांनी दिलेला अभ्यास आमच्यापर्यंत पोंहचत नाही. परंतु दोन तीन जणांचा गट करून अभ्यास करत आहोत.

- प्रवीण महाले, विद्यार्थी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com