अपुर्‍या गाड्यांमुळे प्रवाशांची परवड

जुन्या वेळापत्रकाप्रमाणे बससेवेची मागणी
राज्य परिवहन महामंडळ बसचे प्रातिनिधिक छायाचित्र
राज्य परिवहन महामंडळ बसचे प्रातिनिधिक छायाचित्र

ओझे । वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यात (Dindori taluka) करोना (corona) विषाणूच्या संसर्गामुळे सलग दोन वर्ष व त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Transport Corporation) कर्मचारी संपामुळे (Employee strike) ग्रामीण भागातील एसटी बसची सेवा (ST Bus Service) संपूर्णपणे विस्कळीत झाली होती,

मात्र सध्या हि सेवा काही प्रमाणात सुरू झाली असून त्यात पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे ग्रामीण भागात (rural area) बस सेवा चालू नसल्यामुळे विद्यार्थी (students) व प्रवासी वर्गाची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुर्वीच्या वेळापत्रका प्रमाणे तालुक्यात बस सेवा (Bus Service) चालू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दिंडोरी तालुक्यातील करंजवण, लखमापूर, ओझे, पिंपरखेड, खेडले, म्हेळुस्के, कादवा म्हाळूंगी या गावामधील बससेवा पुर्वीच्या वेळापत्रका प्रमाणे सुरळीत चालू नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दिंडोरीसह नाशिकला (nashik) जाण्यासाठी बस आहे मात्र हिच बस परत येण्यासाठी चालू न झाल्यामुळे विद्यार्थीचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी (students) मोठ्या प्रमाणात तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी शाळा (school), कॉलेज (college), आयटीआय, क्लास तसेच विविध कोर्ससाठी बाहेर जातात. मात्र या अपुर्‍या बससेवेमुळे या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा (education) खेळ खंडोबा होत आहे. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना या अपुर्‍या बससेवेमुळे 5 ते 7 किमीचा पायी प्रवास करावा लागत आहे असल्यामुळे अनेकदा घरी पोहचण्यास सांयकाळ होत असल्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागातील गरिब कुटूंबातील विद्यार्थी आज मोलमजुरी करून शिक्षण घेतात आशा मुलाना बस बंदचा फटका बसताना दिसत आहे.

तालुक्यातील अनेक गावामध्ये सध्या मुक्कामी बस सोडली तर दिवसभर बस येत नाही. आज हि ग्रामीण भागामध्ये मोलमजुरी करणार्‍या जनतेचे प्रवासाचे मुख्य साधन म्हणजे लालपरीच आहे. सध्या हिच लालपरीच रुसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे. या बंद बस सेवेमुळे अनेक गावातील जनतेला आठवडे बाजाराला जाता येत नाही. त्याप्रमाणे एसटी बस (ST Bus) चालू नसल्यामुळे सकाळी प्रत्येक गावातील चौका चौकात वाचले जाणारे वर्तमानपत्रही बंद असल्यामुळे वाचकांची ही गैरसोय झाल्याचे चित्र दिसत आहे.

त्याचप्रमाणे या बस सेवेचा टपाल सेवेवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे अनेक पोस्ट मास्तरांना गावापासून चार ते पाच किलोमीटर पर्यंत टपाल सेवेची ने- आणा करावी लागत आहे. यासाठी नासिक जिल्हा (nashik district) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने दिंडोरी तालुक्यातील एसटी बससेवा पुर्वीच्या वेळापत्रकानुसार चालू करण्याची मागणी विद्यार्थी व प्रवासी वर्गाकडून वारंवार केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com