मालेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी अद्वय हिरे, उपसभापतीपदी चव्हाण

मालेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी अद्वय हिरे, उपसभापतीपदी चव्हाण

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

येथील कृषि उत्पन्न बाजार समितीवर महाविकास विकास आघाडीने आपला झेंडा फडकवत पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांची दोन दशकाची सत्ता संपुष्टात आणली. समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे शिवसेना उपनेते डॉ. अद्वय प्रशांत हिरे (Advay Hiray) यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद गुलाबराव चव्हाण (Vinod Chavan) यांची बिनविरोध निवड केली गेली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळीत एकच जल्लोष केला....

मालेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी अद्वय हिरे, उपसभापतीपदी चव्हाण
Accident News : भरधाव कारची दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

पालकमंत्री दादा भुसे व शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या पॅनलमध्ये पारंपारिक लढत रंगल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीने वेधून घेतले होते. हिरे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने लढवलेल्या १५ पैकी १४ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील आपलं पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. माजी सभापती बंडुकाका बच्छाव याच्या समर्थक विजयी संचालकाचे समर्थन देखील हिरे यांना लाभल्याने १५ संचालक हिरे यांच्या बाजुने झाले होते. त्यामुळे समितीवर स्पष्ट बहुमताच्या जोरावर महाविकास आघाडीचेच (Mahavikas Vikas Aaghadi) सभापती-उपसभापती विराजमान होणार असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले होते.

मालेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी अद्वय हिरे, उपसभापतीपदी चव्हाण
Nashik : शिवशाही बस चालकाची बसमध्येच आत्महत्या

सभापती-उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर सर्व नवनिर्वाचित संचालकांना पर्यटनासाठी दोन दिवसापुर्वी इगतपुरी येथे नेण्यात आले होते. याठिकाणी संचालकांनी आग्रह धरत सभापतीपदी अद्वय हिरे यांचे नाव निश्चित केले तर उपसभापतीपदासाठी हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनोद चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असता त्यास सर्व संचालकांनी अनुमोदन दिले होते. आज सकाळी बाजार समिती सभागृहात सकाळी ११ वाजता उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांच्या विशेष सभेस प्रारंभ केला गेला.

मालेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी अद्वय हिरे, उपसभापतीपदी चव्हाण
सोशल मीडियाची किमयाच न्यारी, चोरी झालेला ट्रॅक्टर आला दारी

यावेळी दोन्ही पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सभापतीपदासाठी अद्वय हिरे यांचा नामांकन अर्ज दाखल केला गेला. हिरे यांना सुचक म्हणून उज्जैन इंगळे यांनी तर अनुमोदन रविंद्र सूर्यवंशी यांनी दिले. उपसभापतीपदासाठी विनोद गुलाबराव चव्हाण यांचा नामांकन अर्ज दाखल केला गेला. त्यांना सुचक म्हणून संदीप पवार तर अनुमोदक म्हणून रविंद्र मोरे यांनी स्वाक्षरी केली. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत दोनच अर्ज दाखल झाल्याने सभापतीपदी अद्वय हिरे तर उपसभापतीपदी विनोद चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी शेळके यांनी करताच उपस्थित संचालक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

मालेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी अद्वय हिरे, उपसभापतीपदी चव्हाण
'जिथे भाजपचे सरकार येत नाही तिथे...'; केजरीवालांचा निशाणा

दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार अधिकारी स्वप्निल मोरे, समिती सचिव अशोक देसले, लेखाधिकारी कमलेश पाटील आदींनी सहाय्य केले. नवनिर्वाचित सभापती-उपसभापतींसह संचालकांचा बाजार समिती प्रशासक असलेल्या उपनिबंधक जितेंद्र शेळके यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

२० वर्षे बाजार समितीत फक्त अर्थकारणाचे राजकारण केले गेले. त्यामुळे मतदारांनी सत्ता परिवर्तन घडवले आहे. आजपासून समितीत शेतकरी, व्यापारी, हमाल-मापारी यांच्या हिताचेच काम केले जाईल. समितीत येणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याचा सन्मान होईल. विरोधी गटातील संचालकांना देखील विश्वासात घेवून कामकाज केले जाईल.

अद्वय हिरे, सभापती, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com