येवला : ऍड.सुभाष सोनवणे यांचे निधन

येवला : ऍड.सुभाष सोनवणे यांचे निधन

येवला | प्रतिनिधी

येवले तालुक्यातील सहकार महर्षी गोविंद नाना सोनवणे यांचा सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील लोकसेवेचा वारसा सांभाळणारे ऍड.सुभाष गोविंदराव सोनवणे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने येवला तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे...

दिवंगत ऍड. सोनवणे यांचे आज पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास निधन झाले. ऍड सोनवणे हे नाशिक स्थित महात्मा फुले शिक्षण संस्था, पखाल रोड, नाशिकचे विद्यमान अध्यक्ष, सहकार महर्षी गोविंदनाना सोनवणे सहकारी पतपेढी, अंदरसुल ता.येवला,

या संस्थेचे कार्यकारी संचालक, अंदरसुल अर्बन को - ऑपरेटिव्ह बँक, अंदरसुल ता.येवला, या बँकेचे संस्थापक संचालक व विद्यमान संचालक, अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ, अंदरसुल ता.येवला या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक सरचिटणीस तथा विविध सहकार व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उच्च पदावर कार्यरत होते.

शांत, धीरोदात्त, सय्यमी व समाजपयोगी नेतृत्व हे गुण अण्णांच्या आचरणात कायम असत. कुणी कितीही मोठ्या आवेशात कुठलीही भूमिका मांडली तरी त्यास शांतपणे उत्तर देऊन संस्थेचे तथा समाजाच्या उन्नतीसाठी सहनशील भावना आण्णा यांनी त्यांच्या हयातीत जोपासली.

येवला तालुक्यातील सहकार क्षेत्रात व राजकीय सामाजिक पटलावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण करुन राजकारणात ऐन वेळी निर्णायक भूमिका निभावणारे ते होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com