यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अध्यक्षपदी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांची निवड

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अध्यक्षपदी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांची निवड

नाशिक | Nashik

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (Yashwantrao Chavan Foundation), मुंबईच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत जिल्हा केंद्र नाशिक च्या पुनर्रचित कार्यकारिणी मंडळास मान्यता देण्यात आली असून अ‍ॅड. नितीन ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

डॉ. अशोक पिंगळे यांची सचिवपदी, विक्रांत मते यांची कोषाध्यक्ष पदी तर अ‍ॅड. राजेंद्र डोखळे,अ‍ॅड. मनीष लोणारी व प्रा सुरेखा बोर्‍हाडे यांची सदस्यपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळाची निवड ही पुढील तीन वर्षासाठी आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अध्यक्षपदी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांची निवड
महाराष्ट्र दिन साजरा करण्याविषयी शासनाची नियमावली जाहीर; 'हे' आहेत निर्देश

खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक सेंटरचे काम जोरात सुरु असून सेन्टरच्या वतीने मागील कार्यकाळात अत्यल्प दरात गरीब व गरजूंना पुरी भाजी केंद्र, गोदावरी स्वच्छता, गझल गायन, विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने नियमितपणे घेतली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), उपाध्यक्ष पदी अरुण गुजराथी, कार्याध्यक्षपदी खा.सुप्रिया सुळे तर खजिनदार पदी हेमंंत टकले काम पाहत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com