कोचिंग क्लास टीचर्स फेडरेशनच्या कायदेशीर सल्लागार पदी ऍड.बोरसे

कोचिंग क्लास टीचर्स फेडरेशनच्या कायदेशीर सल्लागार पदी ऍड.बोरसे

नाशिक । Nashik

कोचिंग क्लास टीचर्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र राज्य संघटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून नाशिकचे ऍड.यशवंत बोरसे यांची एकमताने निवड करण्यात आली.

कोचिंग क्लास टीचर्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र राज्य ही महाराष्ट्रातील राज्यस्तरीय खाजगी शिकवणी चालक यांची संघटना अाहे. कोचिंग क्लासेस चालकांच्या समस्येचे निराकरण करणे, राज्यशासनाकडे त्याचा पाठपुरावा करुन प्रश्न तडीस नेण्याचे काम ही संघटना करते.

ऍड. बोरसे यांनी करोना संकट काळात संघटनेच्या माध्यमातून कोचिंग क्लासेस चालकांचे प्रश्नांना वाचा फोडून राज्य सरकारपर्यंत त्याचा पाठपुरावा केला. त्यांच्या निवडीचे

खाजगी शिकवणी चालक संघटना, नाशिक जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले.

संघटनेचे राज्य अध्यक्ष भुयार सर, सल्लागार संजय कुलकर्णी, नाशिक जिल्हा अध्यक्ष विजय जोशी, सचिव निलेश सुराणा, कोषाध्यक्ष कुणाल कटारिया, राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पिंपळकर आदिंनी अभिनंदन केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com