अॅड. बाकेराव बस्ते पदवीधरसाठी मविप्र पुरस्कृत उमेदवार

अॅड. बाकेराव बस्ते पदवीधरसाठी मविप्र पुरस्कृत उमेदवार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अधिसभा (सिनेट) पदवीधर मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी (Election) खुल्या गटातून अॅड.बाकेराव बस्ते (Adv.Bakerao Baste) हे मविप्र (MVP) संस्था पुरस्कृत अधिकृत उमेदवार (Candidate)असणार आहेत...

या उमेदवारीसाठी मविप्र संस्थेचे सरचिटणीस (MVP General Secretary) अॅड नितीन ठाकरे (Adv Nitin Thackeray) यांनी त्यांच्या नावाची संस्थेच्या अॅड विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्र महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत घोषणा करत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा पाठींबा दर्शविला.

यावेळी संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.आर.डी.दरेकर, डॉ नितीन जाधव, डॉ.डी.डी.लोखंडे, प्रा.संजय पाटील,प्राचार्य डॉ.व्ही.बी. गायकवाड, मविप्र संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. पदवीधर मतदारसंघासाठी (Graduate Constituencies) विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सुमारे ९० हजार मतदार (Voter) असून नाशिक जिल्ह्यात सुमारे १७ हजार मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. तसेच २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडेल.

दरम्यान,अॅड बाकेराव बस्ते हे संस्थेचे सभासद असून त्यांना अॅड.बाबुराव ठाकरे, अॅड.विठ्ठलराव हांडे,डॉ.वसंत पवार,डॉ.डी.एस.आहेर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी मविप्र संस्थेच्या निवडणुकीसाठी निवडणूक मंडळ सदस्य म्हणून २५ वर्ष काम केलेले आहे. ते संस्थेच्या घटना दुरुस्तीचा सदस्य म्हणून देखील कार्यरत होते. तसेच के.टी.एच. एम.महाविद्यालयाच्या (KTHM College) स्थानिक व्यवस्थापन समितीवर देखील ते गेल्या ३५ वर्षापासून कार्यरत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com