वाह रे पठ्ठ्यांनो! एकाच कॉलेजच्या ५५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

साडेतीन लाख ते साडेपाच लाख रुपये प्रतिवर्ष मिळाला पगार
वाह रे पठ्ठ्यांनो! एकाच कॉलेजच्या ५५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या (Maratha Vidya Prasarak Samaj) कर्मवीर अॅड बाबूराव गणपतराव ठाकरे (Karmveer adv baburao ganpatrao thakckeray) अभियांत्रिकी महाविद्यालय (Engineering college) व सॅप (एस.ए.पी.) यांच्यातर्फे राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन नुकतीच ५५ विद्याथ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली....

कॅपजेमिनी (capgemini), कॉग्निझंट(cognizant),एच.सी.एल (HCL).,टीसीएस (TCS), एंटीटी डेटा (entity data pune) आणि इतर काही कंपन्यांनी ३.५ लाख ते ५.५ लाख पॅकेज देऊन विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

जगातील सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये सॅप प्रणालीचा वापर होत आहे तसेच वापर वाढत आहे. प्रणालीवर काम करण्यासाठी सॅप सर्टिफिकेशन (Sap certification) करणे गरजेचे असते. उत्तर महाराष्ट्रात सॅप (Sap) प्रशिक्षणाची यशस्वी सुरवात मविप्र संस्थेच्या कर्मवीर अॅडव्होकेट बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात २०१५ साली केली.

असे प्रशिक्षण सुरू करणारे हे एकमेव महाविद्यालय आहे. उत्पादन क्षेत्रात आलेलया मंदीमुळे अभियांत्रिकीच्या संबंधित सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात उत्तम नोकरी मिळवण्यासाठी सॅप सर्टिफिकेशन ची खूप मदत होत आहे.

विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल सरचिटणीस नीलिमा पवार , अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, सभापती माणिक बोरस्ते, चिटणीस डॉ.सुनील ढिकले, उपसभापती राघो आहिरे सर्व संचालक,शिक्षणाधिकारी डॉ.एन.एस.पाटील,डॉ.सुदर्शन कोकाटे, प्राचार्य डॉ.सतीश देवणे आणि उपप्राचार्य प्रा.नितिन देसले यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना सॅप समन्वयक महेश चौधरी व प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी विनीत देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

मविप्रच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात माफक दरात, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
“अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरीच्या संधी कमी होत असताना 'सॅप' सारख्या रोजगारक्षम प्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी चांगला पर्याय म्हणून बघावे. आनंदाची बाब म्हणजे प्रशिक्षणामुळे मागील चार वर्षात चारशे पन्नास हुन अधिक विद्यार्थ्यांना आतापर्यंत रोजगार उपलब्ध झाला आहे.

नीलिमा पवार , सरचिटणीस , मविप्र

Related Stories

No stories found.