आता पालकही होतील साक्षर; १७० प्रौढ साक्षरता संचचे वाटप

आता पालकही होतील साक्षर; १७० प्रौढ साक्षरता संचचे वाटप

नाशिक | प्रतिनिधी Nashik

रोटरी इंटरनॅशनलच्या (Rotary International) प्रौढ साक्षरता (Adult Literacy campaign) अभियान अंतर्गत रोटरी क्लब ऑफ नशिककडून (Rotary club of nashik) साक्षरता साधन सामुग्री संचाचे वाटप करण्यात आले....

यावेळी आनंदवल्लीतील ज़िल्हा परिषद शाळेत तसेच काठेगल्लीतील अटल बिहारी वाजपेयी शाळेत प्रौढ साक्षरतेसाठी विशेष प्रयत्न रोटरीकडून केले जात आहेत. यासाठी दोन कार्यक्रमात १७० नागरिकांना प्रौढ साक्षरता साधन सामुग्री संचाचे ( Adult Literacy Kits) वाटप करण्यात आले. या संचामध्ये अक्षर ओळख, अंक ओळख, लेखन पुस्तिका, फळ व फुलांची चित्र, बाराखडी, घरी सराव करण्यासाठी दोनशे पानी वही आणि लेखन साहित्याचा समावेश आहे.

आनंदवल्ली ज़िल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे तसेच काठेगल्ली येथील अटल बिहारी बाजपेयी शाळेचे मुख्याध्यापक पाटील या दोघांनीही रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. प्रौढ साक्षरता अभियान कार्याचे कौतुक दोन्ही शाळांनी केले. अशा प्रकारच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा नक्कीच साक्षर होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

तसेच या प्रौढ साक्षरता साधन सामुग्री संचाचा उपयोग करून त्याचा कसा लाभ होत आहे याबद्दल वेळोवेळी रोटरी क्लब ऑफ नाशिकला माहिती देऊ अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. या किट्सचा उपयोग पालकांना आणि विद्यार्थ्यांना नक्की होईल. आनंदवल्ली येथील शाळेतील मुख्याध्यापकांनी रोटरी क्लबने त्यांच्या शाळेत छोटे ग्रंथालय सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करावी अशी विनंती केली.

काठेगल्लीतील शाळेत मुख्याध्यापकांनी सुद्धा शाळेचा सर्वागीण विकास होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने मदत करावी अशी विनंती केली. याच कार्यक्रमात शंभर विद्यार्थ्यांना आपले हात स्वछ कसे धुवावे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी टीच डिरेक्टर उर्मी दिनानी, लिटरसि चेयर सुचेता महादेवकर यांनी परिश्रम घेतले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा रोटे डॉ श्रीया कुलकर्णी, दिलीपसिंग बेनीवाल, वैशाली जोशी, निलेश सोनजे, मंगेश अपशंकर, विनायक व उर्मिला देवधर हे सर्व रोटेरिअन्स कार्यक्रमास उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com