प्रवेश
प्रवेश
नाशिक

उद्यापासून पाॅलिटेक्निकचे प्रवेश

सर्व प्रक्रिया ऑनलाइन

Bharat Pagare

नाशिक | प्रतिनिधी Nashik

उच्च व तंत्र शिक्षण विभागाकजून तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया उद्या दि. १० ते २५ ऑगस्ट या कालावधीत राबविली जाणार आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. 'विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधाकेंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. कराेनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने खबरदारी घेतली जाणार आहे.

कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी या पद्धती सोबतच ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्या पर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकतील.

प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी आणि इ-स्क्रुटीनी पद्धतीची माहिती, अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती, हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com