आयटीआय, पदविका प्रवेशासाठी लागणार चुरस

आयटीआय, पदविका प्रवेशासाठी लागणार चुरस

नाशिक | Nashik

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दहावीची बोर्डाची परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.

परिणामी पुढील शैक्षणिक वर्षात दहावीनंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे अकरावी असो, आयटीआय असो वा पदविका असो या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चांगलीच चुरस लागणार असल्याचे दिसून येणार आहे.

परंतु दहावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी ही चुरस कमी करण्यासाठी आणि अचूक मूल्यांकन व्हावे यासाठी त्याचे निकष ठरविताना पुढील शैक्षणिक वर्षांचा आणि प्रवेशाच्या जागा वाढविण्याचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.

यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली.

तर दरवर्षी राज्यात इतर मंडळातील ५० ते ६० हजारांच्या आसपास विद्यार्थीं अकरावीसाठी प्रवेश घेतात. यंदा बोर्डाची परीक्षा नसल्याने नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी यंदा कोणता निकष लावला जाणार याबाबत विद्यार्थी-पालक आणि शिक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता असल्याचे निदर्शनास येत आहे.

दहावीनंतर अकरावी, आयटीआय आणि पदविका अभ्यासक्रम निवडण्याचे पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतात. या तिन्ही अभ्यासक्रमाच्या मिळून अंदाजे आठ लाखांहुन अधिक जागा आहेत. यात यंदा निश्चितच भर पडणार आहे.

दहावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठीच्या राज्यातील अंदाजे जागा :

अकरावी (ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया) : ५, ५९, ३४४

आयटीआय : १, ४५, ०००

पदविका : १, ०५,०००

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com