शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू

शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू

अर्ज सादर करण्याचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

समाज कल्याण विभागाच्या Department of Social Welfare शासकीय वसतिगृहामध्ये Government Hostel प्रवेश प्रक्रिया Admision process सुरु झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक सत्रातील कोविड-19 मुळे असाधारण परिस्थिती निर्माण झाली असल्याने विद्यार्थ्यांचे या दोन्ही शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश एकत्रितरित्या देण्यात येणार आहेत.

दरम्यान नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या पुढील शैक्षणिक सत्रा करीतासुध्दा ही प्रवेशाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दि. 25 नोव्हेंबरपर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातून अर्ज प्राप्त करून, ते अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह त्याच वसतिगृहात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याविषयीच्या अधिक माहिती साठी संबंधित शासकीय वसतिगृह येथे संंपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांनी केले आहे.

विभागातील सर्व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 10 वी व 11 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक / व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल.

प्रवेश घेण्यासाठी-

दि. 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज प्राप्त करुन इच्छुक विद्यार्थ्यांनी 11 वी व 12वी तसेच प्रथम व द्वितीय वर्षाकरिता आपले अर्ज 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित गृहप्रमुख/गृहपाल यांच्याकडे सादर करावेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com