औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशप्रक्रिया सुरू

विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विविध उपाययोजना
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशप्रक्रिया सुरू

सातपूर । प्रतिनिधी Satpur

सातपूर औद्योगिक वसाहती ( Satpur Indisrial Area ) मधील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश घेण्यासाठी 17 जून 2022 पासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. सातपूर आयटीआय मध्ये एकूण 27 विविध कोर्स साठी एकूण 1 हजार 332 जागा उपलब्ध असून,कोर्स नुसार 1 ते 3 सत्र मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

देशातील 27 आयटीआय ( ITI) व राज्यातील नाशिकला मॉडेल आयटीआय बनवण्याच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात येत असून, त्यादृष्टीने नवनवीन उपाय योजना करण्यात येत आहेत.त्याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विविध उपाय योजना करण्यासाठी उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. पत्रकार परिषदेत सातपूर शासकिय आयटीआय संस्थेचे प्राचार्य राजेश मानकर यांनी दिली.यावेळी आयएमसी चेअरमन सुधीर पाटील, उपप्राचार्य सी.बी.बुरकुल, गटनिर्देशक प्रशांत बडगुजर, उपस्थित होते.

सातपूर आयटीआय च्या वतीने प्रवेश प्रक्रिया बाबत ची माहिती, कोर्स बाबत ची माहिती व प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर भविष्यात मिळणार्या विविध सरकारी, निमसरकारी व खाजगी आस्थपणा मध्ये मिळणार्या संधी बाबत दर गुरुवारी ऑनलाइन , शुक्रवारी ऑफलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. दि.22 जून पासून अर्ज स्वीकृती केंद्रात प्रवेश अर्ज निश्चित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय व मान्यताप्राप्त व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकड्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील प्रशिक्षण सुविधांचा दर्जावाढ करणे, प्रशिक्षणार्थ्यांना अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणे,ऑन जॉब ट्रेनिंग, रोजगाराच्या संधी, प्रशिक्षण कार्यक्रम, अद्ययावत यंत्रसामुग्री व उपकरणे उपलब्ध करून देणे, इतर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देणे यासारख्या बाबी प्रथम प्राधान्याने राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

मॅनेजमेंट कमिटी

विद्यार्थ्यांना कौशल्य विकास करण्यासाठी इंडस्ट्रियल मॅनेजमेंट कमीटीस्थापन करण्यात आलेली असून या कमिटीच्या चेअरमन पदी सुधिर पाटील यांची नियूक्ती करण्यात आलेली आहे. तसेच या कमिटीचे व्हाईस चेअरमन पदी प्राचार्य राजेश मानकर हे आहेत. तर कमिटी सदस्य म्हणून उद्योगांचे प्रतिनिधी प्रकाश बारी, विनायक पाटील तसेच आयटीआयचे निदेशक प्रशांत बडगुजर व पॉलिटेक्नीकचे प्रा.नाठे, रोजगार व कौशल्य विकासच्या अनिसा तडवी यांची निवड करण्यात आलेली आहे.

उत्पादनाभिमुख प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना व्यवसायीक प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी सेमि फिनीश उत्पादने केली जाणार आहेत. त्याबाबत उद्योगांतून उत्पादने घेतल जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट उद्योगांतील उत्पादनांचा अनुभव मिळणार आहे. त्यातून त्यांची गुणवत्ता विकास करण्यास मदत होणार असल्याचे सुधिर पाटील यांनी सागितले. रेल्वेच्या 25 हजार निसचे उत्पादन करण्याची मागणी झालेली असून त्यांना बाजार भावापेक्षा कम दरात उत्पादन मिळू शकणार असल्याचे दिसून येत आहे. या पद्धतीने उद्योगांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com