'एम.फिल. इन क्लिनिकल सायकोलॉजी' साठी प्रवेश प्रक्रिया सुरु

'एम.फिल. इन क्लिनिकल सायकोलॉजी' साठी प्रवेश प्रक्रिया सुरु

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (MUHS) सन 2021-2022 करीता विद्यापीठाचा एम.फिल इन क्लिनिकल सायकोलॉजी (Mphil Clinical Psychology) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत दि. 07 जानेवारी 2022 पर्यंत आहे.

विद्यापीठातर्फे सुरु करण्यात आलेल्या एम.फिल इन क्लिनिकल सायकोलॉजी अभ्यासक्रमाला नवी दिल्ली येथील भारतीय पुनर्वसन परिषद यांची व अभ्यासक्रमासंदर्भात राज्य शासनाचे मार्गदर्शक सूचनांन्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. विद्यापीठाचे संलग्नित पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेज येथील ससून हॉस्पिटल कॅम्पस येथे महाराष्ट्र मेंटल हेल्थ मध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता एम.फिल इन क्लिनिकल सायकोलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

एम.फिल इन क्लिनिकल सायकोलॉजी अभ्यासक्रमास प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांची सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

इच्छुक विद्यार्थी व अभ्यागतांसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एम.फिल इन क्लिनिकल सायकोलॉजी अभ्यासक्रमासंदर्भात माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासंदर्भात शैक्षणिक पात्रता, नांेदणी शुल्क, प्रवेश क्षमता, आरक्षण, परीक्षेचे स्वरुप, नियमावली, प्रवेश अर्ज इत्यादी माहिती देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com