मुक्तच्या विविध विद्या शाखांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
USER

मुक्तच्या विविध विद्या शाखांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

ऑनलाईन प्रवेश अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत

नाशिक । Nashik

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) विविध अभ्यासक्रमासाठी १ जुलै पासुन प्रवेश प्रक्रिया (Admission Process) सुरु झाली आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश (Online Admissions) घेता येणार आहे.

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा (Faculty of Anthropology and Social Sciences), वाणिज्य व्यवस्थापन (Commerce Management), विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्यविज्ञान, शिक्षणशास्त्र, संगणकशास्त्र, निरंतर शिक्षण, कृषी विज्ञान, शैक्षणिक सेवा, सहयोग व विशेष उपक्रम अशा विविध विद्या शाखांच्या प्रंमाणपत्र, पदवीका, पदवी, पदव्युतर पदवी अर्ज करता येतील. अर्ज प्रक्रियेतील अडचणीसाठी विद्यापीठाकडून २२३०५८०,२२३१७१५ हे हेल्पलाईन क्रमांक (Helpline Numbers) देण्यात आले आहे.

अधिक माहीतीसाठी विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.दिनेश भोंडे (Dr. Dinesh Bhonde) यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com