शासकीय आदिवासी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

1 डिसेंबर अर्जाची अंतिम मुदत
शासकीय आदिवासी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक कार्यालयांतर्गत Integrated Tribal Development Project Nashik शैक्षणिक वर्ष 2021-2022 करीता विभागीय व जिल्हास्तरावर इयत्ता 11 वी पासून पुढे तसेच तालुका व ग्रामीण स्तरावर इयत्ता 8 वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या नवीन व जुन्या विद्यार्थ्यांकरिता शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने 1 डिसेंबर 2021 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना Assistant Collector Varsha Meena यांनी केले आहे.

राज्यात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत एकूण 32 मुला व मुलींचे शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर 4 डिसेंबर 2021 रोजी नविन प्रवेशार्थी विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड करून यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, प्रसिद्ध केलेल्या यादीतील निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना 10 डिसेंबर 2021 रोजी प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच डिप्लोमा व व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी कॅ प राऊन्ड पूर्ण झाल्यानंतर वसतिगृह प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे, प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी े कळविले आहे.

अनुसूचित जमातीच्या नवीन व जुन्या अशा विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी स्वयंम.महाऑनलाईन.जीओव्ही. इन या संकेतस्थळावर नोंदणी करून महाविद्यालय प्रवेशाच्या आधारावर विविध अभ्यासक्रमाकरीता अर्ज सादर करावा. जे विद्यार्थी 2020-2021 या शैक्षणिक वर्षात जुने प्रवेशित आहे, अशा विद्यार्थ्यांनी चालु शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज सादर करणे आवश्यक असून, जुन्या विद्यार्थ्यांनी युझर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी दिलेल्या संकेतस्थळााचा चा उपयोग करून अर्ज सादर करावा.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करतांना इयत्ता 10 वी व 12 वी या शैक्षणिक वर्षाची गुणपत्रिका, क्रमांकासहीत असणारे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, चालुवर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा व महाविद्यालयाचे बोनाफाईड किंवा प्रवेश पावती, पालकांच्या उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक यांच्या छायांकीत प्रती व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com