शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांचे प्रवेश सुरू

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांचे प्रवेश सुरू

दिंडोरी । Dindori (प्रतिनिधी)

शिक्षण हक्क कायदा (RTE-2009) अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील 27 शाळांमध्ये राखीव 210 जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 मार्च पासून सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्तार अधिकारी गवळी यांनी केले आहे.

प्रवेशासाठी वंचित गटातील अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, विजा (अ), भटक्या जमाती (ब), इतर मागास प्रवर्ग, दिव्यांग बालके, एच आय व्ही प्रभावित बालके, आर्थिक दुर्बल घटकातील बालके हे पात्र आहेत.

सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांच्या उत्पन्न दाखला आवश्यक नाही, मात्र जातीचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे,दिव्यांग बालकासाठी व एच आय व्ही बाधित बालकांना जिल्हा शल्य चिकित्सक व सक्षम अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील खुल्या प्रवर्गातील बालकांच्या पालकांचे उत्पन्न 1 लाख च्या आत असल्याचे सन 2020-21 या वर्षांसाठी चा सक्षम अधिकार्‍यांचा उत्पन्न दाखला प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे गटशिक्षणाधिकारी कनोज, विस्तार अधिकारी गवळी यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com