
त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी | Trimbakeshwar
त्रंबक नगरपालिकेच्या (Trambakeshwar Municipality) विद्यमान पदाधिकारी व नगरसेवकांची पंचवार्षिक मुदत पाच जानेवारीला संपत आहे.
त्यामुळे त्रंबकेश्वर नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट (Administrator rule) येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्र्यंबकरांचे दि. 6 जानेवारीला काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. दि.22 डिसेंबर 2017 रोजी त्रंबकेश्वर नगरपालिकेची (Trambakeshwar Municipality) निवडणूक (election) झाली होती.
तर पहिली सर्वसाधारण सभा दि.२ जानेवारी 2017 रोजी झाली होती. त्यामुळे आता पालिकेची पंचवार्षिक टर्म 5 जानेवारीला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट (Administrator rule) येण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर पालिकेने 5 जानेवारीला मुदत संपत असल्याबद्दल नगर विकास खात्याला (Urban Development Department) कळवले असून पुढील मार्गदर्शन मागविले आहे.
तज्ञांच्या मते आता पाच जानेवारीला अथवा सहा जानेवारीला प्रशासकाची शासनाकडून नियुक्ती होणार का या कडे लक्ष लागले आहे. नाशिक जिल्ह्यात (nashik district) त्रंबकेश्वर (Trambakeshwar) व इगतपुरी (igatpuri) नगरपालिका या दोन्ही नगरपालिकांच्या बाबतीत वरील प्रमाणे स्थिती असल्याने या दोन्ही नगरपालिकाकडे लक्ष लागले आहे.