दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोडला सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय मंंजुरी

दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोडला सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय मंंजुरी

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन

सिन्नर । Sinnar

सिन्नरसह मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या डीपीआरचे काम पूर्ण करण्याबरोबरच या योजनेला सप्टेंबर 2021 पर्यंत प्रशासकीय मंजुरी देण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

नदीजोड प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी पाटील यांच्या दालनात मंगळवारी (दि.18) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, जलसंपदा विभागाचे सचिव विजय गौतम, नदीजोडचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र जाधव, जलसंपदा विभागाचे मुख्यअभियंता, नाशिकचे अधीक्षक अभियंता नाईक, मुख्यअभियंता बेलसरे आदी उपस्थित होते. नदीजोड प्रकल्पांतर्गत सिन्नरला 7 टीएमसी पाणी मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

युती सरकारच्या काळात नदीजोड प्रकल्पांतर्गत सिन्नरला वगळून मराठवाड्याला पाणी देण्याचे ठरले. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच या योजनेत दुष्काळी सिन्नरचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यासाठी या योजनेच्या डीपीआरमध्ये काही बदल करण्याचेही सुचविण्यात आले. लवकरात लवकर नदीजोड प्रकल्पाच्या डीपीआरला मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन या योजनेला मान्यता देण्याबरोबरच कामेही तत्काळ सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यास सप्टेंबरपर्यंत मंजुरी देण्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com