कालव्यांऐवजी बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठ्यास मंजुरी

कालव्यांऐवजी बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठ्यास मंजुरी

मालेगाव । प्रतिनिधी

बोरी-आंबेदरी व दहिकुटे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांऐवजी बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीच्या विशेष दुरुस्ती प्रकल्पास 25.21 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचे भुसे यांनी सांगितले.

मालेगांव तालुक्यातील टिंगरी गावाजवळ 1992 साली बोरी नदीवर बोरी-आंबेदरी लघु पाटबंधारे प्रकल्प तर दहिकुटे गावाजवळ 1975 साली कान्हेरी नदीवर दहिकुटे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या माती धरणाचे काम करण्यात आले. बोरी-आंबेदरी धरणाचा एकूण पाणीसाठा 3.54 द. ल. घ. मी. तर दहिकुटे धरणाचा एकूण पाणीसाठी 3.57 द. ल. घ. मी. इतका आहे.

बोरी-आंबेदरी प्रकल्प अंतर्गत झोडगे, अस्ताणे, जळकु, वनपट, लखाणे, राजमाने, दहिदी, गाळणे, टिंगरी, हरणशिकार या गावातील एकुण 910 हेक्टर सिंचन क्षेत्र तर दहिकुटे प्रकल्प अंतर्गत देवारपाडे, जळकु, झोडगे, चिखलओहोळ, दसाणे, दहिकुटे, माणके, सायने खु. या भागातील एकूण 648 हेक्टर इतके सिंचन क्षेत्र आहे. या दोन्ही धरणांचे कालवे खडकाळ व मुरमाड जमिनीतून जात असल्यामुळे 80 ते 90 टक्के पाणी वाया जात असल्यामुळे परिणामी दोन्ही धरणांचे सिंचन क्षेत्र कमी होवुन कालव्याच्या शेवटच्या भागातील क्षेत्र सिंचनापासून वंचित राहत होते.

त्यामुळे या दोन्ही प्रकल्पाच्या कालव्यांद्वारे होणारी पाण्याची गळती रोखुन शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचून सिंचन क्षेत्राची पुर्नस्थापना करण्यासाठी बंदिस्त नलिका प्रणाली हा विशेष महत्त्वाकांक्षी प्रकल्प भुसे यांनी हाती घेतला आहे.

बोरी-आंबेदरी लघुपाटबंधारे या प्रकल्पाच्या 11 कि. मी. व झोडगे येथील 7 कि. मी. मध्ये बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करणेसाठी विशेष दुरुस्तीकामास 17.85 कोटी रुपये व दहिकुटे उजवा कालवा बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करणेकामी 7.36 कोटी रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकिय मान्यता मिळाली आहे, असे भुसे यांनी सांगितले.

बंदिस्त नलिकेद्वारे पाणी वाहून नेले जाणार असल्याने आवर्तन काळात पाण्याची गळती थांबल्याने सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होऊन शेतकर्‍यांना सिंचन क्षेत्राचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com