विकासकामांना प्रशासकीय मान्यता - नगराध्यक्ष सुनील मोरे

विकासकामांना प्रशासकीय मान्यता - नगराध्यक्ष सुनील मोरे

सटाणा । प्रतिनिधी Satana

शहरातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून (District Planning Development Board ) 5 कोटी 5 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर विकासकामांना ( Devlopment works ) यापूर्वीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे ( Sunil More- Satana Town Council ) यांनी दिली.

जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून सनपास सदर निधी प्राप्त झाल्याचे स्पष्ट करत नगराध्यक्ष मोरे पुढे म्हणाले, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत 3 कोटी 54 लक्ष 67 हजार 637 इतकी रक्कम प्राप्त झाली असून यामध्ये सटाणा नगरपरिषद हद्दीतील दोधेश्वर नाका ते बागलाण अ‍ॅकेडमीपर्यंत दुभाजकावर स्ट्रीट लाईट बसविणे, शहरातील प्रभाग क्र. 1 व प्रभाग क्र. 2 मधील अभिमन्यूनगर येथे उद्यान विकसित करणे, अभिमन्यूनगरमधील निलगिरी बाग खुली जागा विकसित करणे,

प्रभाग क्र. 5 मधील पुंडलिक नगरमधील उद्यान निर्मिती, प्रभाग क्र. 10 मध्ये रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी, शहरातील अमरधाम येथे कंम्पाऊंड वॉल, प्रभाग क्र. 3 मधील डि. बी. नगर खुल्या जागेत सुशोभिकरण, प्रभाग क्र. 3 मधील संरक्षक भिंत बांधून सुशोभिकरण, प्रभाग क्र. 3 मध्ये राधाकृष्ण नगर मंदिरामधील ग्रीमजीम शहरातील वेगवेगळे ओपनस्पेस विकसित करणे तसेच प्रभाग क्र. 2 मधील रस्ता खडीकरण व डांबरीकरण व प्रभाग क्र. 10 मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे आदी विकासकामांचा या निधीत समावेश असल्याचे नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले.

दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत 78 लक्ष 25 हजार रूपये मंजुर करण्यात आले असून या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलाचे वर बहुउद्देशीय हॉलचे निर्मिती करण्यात येणार असून या हॉलचे सामाजिक उपक्रमासाठी लाभदायी ठरणार आहे. नागरी दलित्तोतर योजनेतंर्गत प्रभाग क्र.10 मधील नाशिक नाका ते पिंपळेश्वर मंदिरापर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण, प्रभाग क्र. 8 मध्ये बाजार ओटे परिसरात काँक्रिटीकरण, रस्ते अस्तरीकरण, प्रभाग क्र. 5 मधील कॉलनी येथे पेव्हर ब्लॉक बसविणेसाठी निधी उपलब्ध झाल्याची माहिती नगराध्यक्ष मोरे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com