भगूर पालिकेत आजपासून प्रशासकीय कारभार

भगूर पालिकेत आजपासून प्रशासकीय कारभार

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali

भगुर नगर पालिकेतील Bhagur Town Council नगराध्यक्ष व नगरसेवक लोकप्रतिनिधीची राजवट दि. 29 डिसेंबर रोजी संपुष्टात आली असून पालिकेचा प्रशासकीय कारभार Administrative affairs नाशिक प्रांत वर्षा मीना Nashik Provincial Officer Varsha Meena आज दि. 30 पासून पाहणार आहे.

दरम्यान पुढील वर्षात नगर परिषद निवडणूका हा होणार असून त्याचे वेध विविध पक्षाना लागले आहे. भगुर नगर पालिकेची लोकप्रतिनिधी राजवट दिनांक दि. 29 डिसेंबर 2021 रोजी संपुष्टात येणार होती. तरीही विद्यमान नगराध्यक्ष, नगरसेवक लोकप्रतिनिधींना अंदाजे सहा महिन्याची मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा होती.

मात्र जिल्हाधिकारी पत्रात सांगितले की, कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वेळेवर पालिका निवडणूक निर्णय घेणे शक्य नसल्याने प्रांत कारभार पाहणार असल्याने साहजिकच आता भगुरपालिकेत राजकीय नेते पक्ष हस्तक्षेप राहणार नाहीत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com