ओझे-म्हेळुस्के रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याला वाली कोण?
ओझे-म्हेळुस्के रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

ओझे | विलास ढाकणे

दिंडोरी तालुक्यातील ओझे ते म्हेळुस्के (Oze to Mheluske) या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून (Chief Minister Gram Sadak Yojana) अडीच वर्षापूर्वी झाले असून सदर रस्त्यांची देखभाल दुरुस्ती पाच वर्षासाठी ठेकेदारकडे आहे. मात्र, वारंवार तक्रार करूनही अधिकारी व ठेकेदार या रस्त्याकडे (Rods) दुर्लक्ष करत असल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे....

ठेकेदाराने मागील वर्षी पावसाळ्याच्या (Rain) तोंडावर धातुरमातुर रस्त्याची दुरुस्ती करून वेळ मारून नेत चालू वर्षी २५ दिवसापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात करून काम अपूर्ण ठेवून ठेकेदार नामानिराळे झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाच्या देखभालीसाठी नेमून दिलेल्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून (Maharashtra Government) जास्तीचा निधी दिला जातो,त्यांचा उद्देश ग्रामीण भागातील रस्त्याचे मजबुतीकरण चांगल्या प्रकारे व्हावे असे आहे. मात्र, अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षितपणामुळे जनतेला निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे परिणाम भोगावे लागत आहे. रस्त्यांचे काम चालू असतांना अधिकारी उपस्थित असल्यास कामाचा दर्जा नक्की चांगला असेल. मात्र, अधिकारी वर्ग कामाकडे न फिरकल्यामुळे रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे रस्त्यांचे काम पहिल्यादां चांगले झाल्यास वारंवार देखभाल दुरुस्तीची गरज भासत नाही. सध्या ठेकेदार खड्डे बुजवण्याचे काम चालू करतात व मागे पुन्हा खड्डा तयार होतो. अशातच ओझे परिसरातून अनेक वेळा या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करूनही अधिकारी व ठेकेदार दुर्लक्ष करत असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने याची दखल घेणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्यांच्या कामाला मुहूर्त सापडेना

म्हेळुस्के फाटा ते कादवा माळुगी (Mheluske Phata to Kadava Malugi) या रस्त्यांचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर असूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे अनेक वेळा ठेकेदार पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांचे काम चालू करतात. त्यावेळी ठेकेदार अतिशय घाईघाईने काम पूर्ण करतात. त्यामुळे रस्त्यांचे काम दर्जदार होत नसल्याचे मंजूर झालेल्या पुलाचे व रस्त्यांचे काम त्वरित चालू करण्याची मागणी ओझे, म्हेळुस्के, कादवा माळुगी येथील ग्रामस्थ करत आहेत.

ओझे ते म्हेळुस्के या मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्यांचे जे काम केले आहे ते अपूर्ण असून हे काम अधिकारी वर्गाने प्रत्यक्ष उभे राहून पूर्ण करावे. तसेच म्हेळुस्के फाटा ने कादवा माळुगी रस्ता व पुल यांचे काम त्वरित चालू करून परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा.

ज्ञानेश्वर शिंदे, ग्रामस्थ ,ओझे

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com