तरुणांच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार

तरुणांच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार

निरपूर । वार्ताहर | Nirpur

बागलाण तालुक्यातील (baglan taluka) तिळवण ग्रामपंचायत (gram panchayat) चुरशीच्या निवडणुकीत (election) पंधरा वर्षापासून सत्तेवर असलेल्या प्रस्थापितांना मतदारांनी (voting) नाकारत व तरुणांच्या परिवर्तन पॅनल कडे ग्रामपंचायतीचा कारभार सोपविला आहे. तिळवण ग्रामपंचायतच्या दहा जागांसाठी निवडणूक पार पडली.

त्यात विमलबाई अमृता बोरसे यांची अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) या प्रवर्गातून थेट सरपंच (sarpancha) पदी प्रचंड मतांनी विजयी झाल्या तर परिवर्तन पॅनलचे भारत प्रल्हाद माळी, पाटील योगराज दौलत, वंदना चंद्रराव पाटील, बापू सावळीराम बोरसे, अमृता शिवराम बोरसे, जोशना जगदीश सूर्यवंशी, कल्पना बापू गुंजाल, वत्सलाबाई पांडुरंग बोरसे, सोनाली साहेबराव जगताप हे उमेदवार दणदणीत मतांनी विजयी होत परिवर्तन पॅनेलने ग्रामपंचायत वर्चस्व प्रस्थापित केले.

तिळवण ग्रामपंचायतच्या दहा जागांसाठी निवडणूक (election) पार पडली. त्यात विमलबाई अमृता बोरसे यांची अनुसूचित जमाती या प्रवर्गातून थेट सरपंचपदी प्रचंड मतांनी विजयी झाल्या तर परिवर्तन पॅनलचे भारत प्रल्हाद माळी, पाटील योगराज दौलत, वंदना चंद्रराव पाटील, बापू सावळीराम बोरसे, अमृता शिवराम बोरसे, जोशना जगदीश सूर्यवंशी, कल्पना बापू गुंजाल, वत्सलाबाई पांडुरंग बोरसे, सोनाली साहेबराव जगताप हे उमेदवार दणदणीत मतांनी विजयी होत परिवर्तन पॅनेलने ग्रामपंचायत वर्चस्व प्रस्थापित केले.

अत्यंत चुरसपूर्ण वातावरणात तिळवन ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती. पंधरा वर्षापासून ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवून असलेल्या प्रस्थापितांना पुन्हा आपली सत्ता येईल असा ठाम विश्वास होता. मात्र मतदारांनी तरुणांच्या (youth) विचारांना साथ देत गावाच्या विकासासाठी परिवर्तन घडवत तरुणांच्या पॅनलला दणदणीत मतांनी विजयी केले. निवडणुकीचा निकाल (Election results) नुकताच जाहीर होताच विजयी उमेदवार समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळीत फटाके फोडून एकच जल्लोष केला .परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व योगीराज पाटील, संदीप देवाजी गुजाल, चेतन अमोल गुंजाळ, या नेत्यांनी केले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com