प्रशासन-सर्व पक्षांतर्फे करोना योध्दांचा सन्मान

प्रशासन-सर्व पक्षांतर्फे करोना योध्दांचा सन्मान
अतिदक्षता विभागातील करोना बाधित रुग्णांशी पीपीई कीट घालून संवाद साधताना जिल्हाधिकारी संजय यादव

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोनाच्या (corona) पहिल्या व दुसर्‍या लाटेत स्वत:सह व कुटूंबाची पर्वा न करता बाधीत रूग्णांना सेवा पुरविणार्‍या विविध विभागाचे सेवक तसेच स्वयंसेवी व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांनी शहर करोनामुक्त होण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे.

या करोना योध्यांचा (Corona Warriors) सर्वपक्षीय व प्रशासनातर्फे (All party and administration) येत्या 21 नोव्हेंबररोजी भव्य कार्यक्रमात सत्कार करत त्यांच्या कार्याचा गौरव केला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत (All party meeting) करोना योध्यांचा सत्कार (Honoring the Corona Warriors) करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत करोना कालावधीत अनेक डॉक्टर्स (Doctors), नर्स (Nurse), आशासेविका, वॉर्ड बॉय, ऑक्सीजन सिलेंडरसाठी काम करणारे कामगार, रुग्णवाहिका कर्मचारी असे अनेकांनी दिवस रात्र मेहनत करुन करोना रुग्णांना सेवा पुरवुन त्यांचा जीव वाचविण्यास मदत केलेली आहे. त्यांचा सहकुटुंब सत्कार मालेगावकरांच्या वतीने व्हावा अशी इच्छा माजी आ. रशीद शेख यांनी व्यक्त केली असता सर्वपक्षीय नेत्यांनी त्यास संमती दिली.

या बैठकीस महापौर ताहेरा शेख, आ. मुफ्ती मोहमंद, उपमहापौर निलेश आहेर, संजय दुसाने, भारत चव्हाण, भारत जगताप, देवराज गरुड, अशोकमामा बैरागी, नरेंद्र सोनवणे, भारत म्हसदे, भिका कोतकर, दिलीप आहिरे, युवराज गोलाईत, एजाज बेग, सुनिल देवरे, शशी निकम, डॉ. जतीन कापडणीस उपस्थित होते.

आपल्या परिसरातील करोना योध्यांची माहिती येत्या दि. 15 नोव्हेंबर पुर्वी उपलब्ध करुन देण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांना ना. भुसे यांनी यावेळी बोलतांना केले. येत्या 21 नोव्हेंबररोजी भव्य कार्यक्रमात या करोना योध्यांचा सत्कार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com