
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
आदिवासी विद्यार्थी (Tribal students), वसतीगृहे (Hostels) आणि आश्रमशाळांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या (All India Tribal Development Council) वतीने सोमवारी (दि.23) येथील आदिवासी आयुक्तालयासमोर आंदोलन (agitation) करण्यात आले.
मागण्या 15 ते 20 दिवसांत सोडवण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अप्पर आयुक्त तुषार माळी (Upper Commissioner Tushar Mali) यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या (students) डीबीटीकडे (DBT) झालेले दुर्लक्ष, सेंट्रल किचनचे निकृष्ट अन्न, आणि विद्यार्थ्यांची मर्यादित क्षमता यासह विविध प्रश्नांवर हे आंदोलन करण्यात आले होते.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच अनुसूचित क्षेत्रातील पदांची पेसा भरती करण्यात यावी, शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदिवासी विभागाच्याच इंग्रजी शाळा असाव्यात, राज्यातील सेंट्रल किचन यंत्रणा (Central kitchen system) बंद करण्यात यावी, आश्रमशाळांमध्येच पूर्वीप्रमाणे जेवण तयार करण्यात यावे, विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळावेत अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केलेल्या आंदोलनानंतर अप्पर आयुक्त माळी यांनी परिषदेच्या मागण्या येत्या 15 ते 20 दिवसांत सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे लकी जाधव यांनी सांगितले.