आदिवासी डांगी बोलीभाषेतील 'पोरगे भात लावाये येजो' गाण्याची सोशल मीडियावर धूम

आदिवासी डांगी बोलीभाषेतील 'पोरगे भात लावाये येजो' गाण्याची सोशल मीडियावर धूम

कळवण | वार्ताहर Kalwan

सध्या मागील काही दिवस सोशल मीडियावर 'सुरगाणा-सुरगाणा' (Surgana Surgana) हे गाणं चर्चेचा विषय ठरला असतांनाच आदिवासी कवी भावेश बागुल (Poet Bhavesh Bagul) यांनी प्रेक्षकांच्या पसंतीस साद देत नवीन गाणे 'पोरगे भात लावाये येजो' (Porage Bhat Lavaye yejo) हे नवीन गाणे बनविले आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल होत आहे....

'पोरगे भात लावाये येजो'(Porage Bhat Lavaye yejo) हे गाणे आदिवासी भागातील भात लावणीवर आधारित हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. आतापर्यंत या गाण्याला युट्यूबवर २ लाख १० हजारांच्यावर प्रेक्षकांनी पाहिले आहे.

या गाण्यातील सर्व कलाकार हे सुरगाणा तालुक्यातील(Surgana Taluka) आहेत. या गाण्याचे चित्रीकरण सुरगाणा तालुक्यातील चिंचला, राशा, भोरमाळ या गावात झाले आहे. या गाण्यामध्ये योगेश चौधरी व काजल गावित यांनी अभिनय केला. या गाण्याचे गायन आदिवासी कवी भावेश बागुल यांनी केले आहे.

छायाचित्रिकरण हरेश बागुल व गणेश पवार तर एडिटिंग माधव गावित व योगेश गावित यांनी केली आहे. या गाण्याला बबलू पाटील डीजे अक्षय ने संगीत दिले. तर या गाण्याला मेकओवर कौशल्या बागुल व संकल्पना पल्लवी वळवी यांनी दिली. या गाण्याची निर्माती मनिषा महाले व दिग्दर्शक प्रवीण गावित हे आहेत.

आदिवासींची संस्कृती काय आहे या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्याचा व ती आपण सर्वांनी जोपासली पाहिजे असे आमच्या टीमच्या वतीने या गाण्यात दाखविण्यात आली आहे आगामी काळात हीच आदिवासी परंपरा कशी जपली जाईल याचा विचार आमची टीम करत आहे.

भावेश बागूल, आदिवासी गायक / गीतकार, चिंचला, ता. सुरगाणा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com