आदित्य ठाकरे शनिवारी नाशकात

आदित्य ठाकरे शनिवारी नाशकात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बुलंद तोफ शनिवार दि.22 जुलैस नाशकात धडाडणार आहे. त्यांच्या उपस्थितीत येथील डेमोक्रसी हॉल येथे होणारा शिवसेना व युवासेनेचा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले.

आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्याच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना करंजकर बोलत होते. व्यासपीठावर उपनेते, सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, विलास शिंदे, डी.जी.सूर्यवंशी, नयना घोलप, निवृर्ती जाधव, जगन आगळे, देवानंद बिरारी, सचिन मराठे, महेश बडवे, राहुल ताजनपुरे, वैभव ठाकरे, देवा जाधव, बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, शैलेश सूर्यवंशी, मंदा दातीर, भागवत आरोटे, प्रशांत दिवे, मसूद जिलानी आदी आदी होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

आगामी महापालिका तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने आदित्य ठाकरे यांच्या या नाशिक भेटीला विशेष महत्त्व आहे. ते शिवसैनिकांना आणि विशेषतः युवकांना बहुमूल्य मार्गदर्शन करणार असल्याने सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मेळाव्यास आवर्जून उपस्थिती लावावी, असे आवाहन करण्यात आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com