जिल्हावासीयांसाठी रेमडेसिव्हिरचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा: खा. गोडसे

जिल्हावासीयांसाठी रेमडेसिव्हिरचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा: खा. गोडसे

देवळाली कॅम्प l Deolali Camp (वार्ताहर) :

आठवडाभरापासून केलेल्या प्रयत्नांना आलेल्या यशातून नाशिक करासाठी सात हजाराहून अधिक रेमडिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत.

मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे अजूनही इंजेक्शन उपलब्ध व्हावीत, यासाठी आज शुक्रवारी खा.हेमंत गोडसे यांनी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाचे व्यवस्थपकीय संचालक अभिमन्यू काळे यांची विशेष भेट घेऊन नाशिक येथील अन्न व पुरवठा खात्यात कर्मचारी वर्ग वाढविणे सह इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असता त्यास काळे यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली.

नाशिक शहरासह जिल्हाभरात करोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांचे वर उपचार करणेसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे, गेल्या आठवड्यात आपण मायलन कंपनीच्या अधिकारी वर्गाशी चर्चा करुन नाशिकसाठी सात हजार इंजेक्शनचा साठा उपलब्ध करुन घेतला आहे. यातील पहिल्या टप्पात अधिकृत विक्रेत्यांना इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहे.

मात्र अजूनही रेमडिसिव्हिरची इंजेक्शनची आवश्यकता आहे ही बाब खा. गोडसे यांनी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाचे व्यवस्थपकीय संचालक अभिमन्यू काळे याचे निदर्शनास आणून दिली.

दरम्यान या समस्याबाबत पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी देखील आपनास संपर्क केलेला असल्याचे काळे यांनी सांगून.नाशिक कारांची मागणी योग्य असल्याने या बाबद सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

त्यामुळे येत्या दोन दिवसात नाशिकसाठी अजून अतिरिक्त रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा साठा पुरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याशिवाय इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या मुंबई तील तीन कंपनीच्या मुख्य कार्यालयात खा. गोडसे यांनी संर्पक साधत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यामध्ये सिपला कंपनीचे अफसर शेख, सन फार्माचे अच्यूत रेडकर, झायडस कंपनीचे विजय भालेराव यांच्याशी चर्चा करुन नाशिकसाठी अतिरिक्त रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

इंजेक्शन व कर्मचारी वर्ग वाढवावा : नाशिक जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग हा देशातील पहिल्या पाच शहरांइतका झाला आहे, त्यामुळे रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा अतिरिक्त साठा पुरविण्यात यावा, तसेच नाशिक शहरातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे तात्काळ भरावीत, ऑक्सीजन साठा साठवणुकीसाठी जेम्बो टॅकची सुविधा करुन ऑक्सीजन पुरवठा सुरळीत करावा.

खा. हेमंत गोडसे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com