३१ डिसेंबरला नाशिक जिल्ह्यात धडक कारवाया

३१ डिसेंबरला नाशिक जिल्ह्यात धडक कारवाया

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांनी ३१ डिसेंबरच्या (31st December) पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात चोख बंदोबस्त लावला होता. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या (Drink and drive) एकूण ४१, अवैध मद्याची विक्री (Sale of illegal alcohol) १२ तर ६ हुक्का पार्लरवर (Hookah Parlor) कारवाई केली आहे...

अवैध मद्याची वाहतूक आणि विक्री, अवैधरित्या सुरू असलेले हुक्का पार्लर व इतर एकूण २९२ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आलेल्या आहे.

सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे (New Year) स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच करोना (Corona) आणि ओमायकॉन (Omicron) महामारीचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमावलीनुसार पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील ४० पोलीस ठाणे निहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

३१ डिसेंबरला नाशिक जिल्ह्यात धडक कारवाया
नाशकात विवाहितेची आत्महत्या

सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हयातील महामार्ग, वर्दळीचे ठिकाणे, चेक पोस्ट आदी ठिकाणांवर बॅरिकेटस् लावून सतर्क नाकाबंदी करण्यात आली होती. ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह तसेच हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट या ठिकाणांवर वाहतुक कोंडी आणि सुरक्षात्मक योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली.

याशिवाय महामार्ग व रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क पेट्रोलिंग करण्यात आली. तसेच महिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस व महिला पथक तैनात करण्यात आले होते.

३१ डिसेंबरला नाशिक जिल्ह्यात धडक कारवाया
Video : नाशकात खा. राऊतांचा दौरा अन् सेनेत आयारामांच्या प्रवेशांची मालिका

बंदोबस्तादरम्यान जिल्हयातील विविध पर्यटन स्थळे, वर्दळीचे ठिकाणे, रिसॉर्ट, हॉटेल्स, ढाबे, मॉल्स आदी परिसरात करडी नजर ठेवण्यात आली होती. जिल्हयातील महामार्ग तसेच वर्दळीच्या ठिकाणांवर लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करण्यात आली.

रात्री उशिरापर्यंत पथकांकडून ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. अवैधरित्या मद्याची विक्री व वाहतूक करणारे आणि मद्य तसेच हुक्का प्राशन करून बेधुंद अवस्थेत मस्ती करणाऱ्या नागरिकांवरही दारूबंदी व कोटपा कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.

उपनगर व सातपूर पोलिसांनी दारुबंदी कायद्यानुसार एकूण तीन गुन्हे दाखल केले असून साथरोग कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल केला आहे. ग्राहक क्षमतेचे पालन न केल्याबद्दल म्हसरुळ येथे पोलीस व महापालिकेच्या पथकाने दोन हॉटेलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावले.

शहरात चार पोलीस उपायुक्त, सहा सहाय्यक आयुक्त, ३५ पोलीस निरीक्षक, १०० सहाय्यक व उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलीस अंमलदारांचा फौजफाटा या बंदोबस्तासाठी तैनात होता. त्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) व जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) हे स्वत: वेगवेगळ्या नाकाबंदीच्या ठिकाही हजर असल्याचे दिसून आले.

Related Stories

No stories found.