
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पोलीस प्रशासनाने (Police Administration) १ डिसेंबर पासून शहरात हेल्मेट सक्तीची (Helmet mandatory) घोषणा केली आहे.
नाशिककरांच्या जिवीताचे पोलीस प्रशासन घेत असलेल्या काळजीबद्दल अभिनंदन करून हेल्मेट सक्ती अगोदर अपघातांस (accident) कारणीभूत समस्यांचे निराकरण करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) रस्ते (road),
साधन, सुविधा व आस्थापना विभागा (Facilities and Establishment Division) तर्फे जिल्हाधिकारी (Collector) व पोलिस आयुक्त (Commissioner of Police) यांना निवेदन (memorandum) देऊन करण्यात आली आहे. रस्ते अपघात (road accident) ही आता सार्वजनिक आरोग्याची (public health) एक मोठी समस्या बनली असून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा धोरणानुसार (National Road Safety Policy) रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये प्रामुख्याने रस्ते, मोटार वाहने तसेच मानवांचाही समावेश होतो.
त्यात रस्ता सुरक्षा समस्यांबद्दल (Road safety issues) जागरूकता वाढवणे, ग्रामीण आणि शहरी रस्त्यांच्या डिझाईनमधील सुरक्षिततेशी संबंधित मानकांचे पालन होणे, सुरक्षित रस्ते पायाभूत सुविधा पुरविणे, सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था स्थापन करणे, रस्ते डिझाइन, रस्ते बांधकाम, वाहतूक व्यवस्थापन आणि कायद्याची अंमलबजावणी यांचा समावेश होतो. असे निवेदनात म्हटले आहे.
तात्काळ ठोस उपाययोजना केल्यावर हेल्मेट सक्ती करून नाशिककरांना दिलासा द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मनसेना प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, रस्ते आस्थापना जिल्हा संघटक अमित गांगुर्डे, मनोज घोडके, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.