अनामत रक्कमेचा अतिरिक्त शॉक; आंदोलनाचा ईशारा

अनामत रक्कमेचा अतिरिक्त शॉक; आंदोलनाचा ईशारा

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

महावितरण ( Mahavitarn ) कंपनीकडून अनामत रक्कम( Security Deposite ), वाढीव बिले ( additional Bills )या नावाखाली जनतेची लुटमार केली जात असून अशा रकमा भरण्यास सर्वसामान्य नागरिकांचा विरोध असल्याने तातडीने ही दर वाढ मागे घेण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भगूरचे माजी उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख (Former Deputy president of Bhagur Kakasaheb Deshmukh )यांनी दिला आहे.

करोना काळात विस्कळीत झालेली आर्थिक घडी कशीबशी सावरत असतानाच चालू मे महिन्याच्या लाईट बिलासह सिक्युरिटी डिपॉजिट बिले दिल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. मध्यमवर्गीय तसेच तळागाळातील नागरिकांना महागाईचे चटके बसत असताना वाढीव वीज बिलाच्या ओझ्याने झुकलेल्या नागरिकांना महावितरणकडून सरासरी अनामत रक्कमेचा अतिरिक्त शॉक देण्यात आला आहे.

दरवर्षी महावितरणकडून डिपॉझिट गोळा केले जाते. मात्र त्या डिपॉझिटचे पुढे काय केले जाते, याची माहिती ग्राहकांना दिली जात नसून महावितरण स्वतःची तूट भरून काढण्यासाठी प्रामाणिक ग्राहकांचे आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अशा प्रकारचे डिपॉझिट न भरण्याचा नागरिकांनी निर्णय घेतलेला आहे. दरवर्षी सिक्युरिटी डिपॉझिट नावाखाली बिले दिली जातात. त्यातील 90 टक्के ग्राहक नियमित बिल भरतात. मात्र तरीही या ग्राहकांना महावितरणकडून दरवर्षी डिपॉझिटचे बिल पाठवली जाते.

वर्षभरात येणार्‍या वीज बिलाची सरासरी काढून त्याच्या दुप्पट किंवा अडीचपट ही अनामत रक्कम घेतली जात असून महावितरण दरवर्षी ग्राहकांकडून करोडो रुपये अनामत रक्कम डिपॉझिटच्या नावाखाली गोळा करते. या रकमेचे ग्राहकांना बिलात कोणतीही सूट मिळत नाही, मग ग्राहकांनी हा भुर्दंड का सहन करावा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. मीटर बसवल्यापासून घेतलेल्या डिपॉझिटचे महावितरण काय करते, याबाबत कोणीही सांगत नाही. दरवर्षी वेळेवर बिले भरून सुद्धा डिपॉझिटची रक्कम पुन्हा का मागितली जाते, या संभ्रमात सर्वसामान्य ग्राहक पडलेले आहेत.

आम्ही सुरक्षा ठेव ग्राहकाकडून गोळा करतो, असे वीज मंडळाकडून सांगण्यात येते. याबाबत महावितरणकडून 2002 च्या आदेशानुसार वर्षभराचा सरासरी बिलाच्या प्रमाणात अतिरिक्त सुरक्षा ठेव गोळा केली जात असून अतिरिक्त डिमांड दिसते तितक्याच रकमेची बिले काढण्यात आली आहेत. या रकमेवरील व्याज एप्रिल ते जून च्या बिलातून ग्राहकांच्या बिलात क्रेडिट केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु प्रत्यक्षात तसे दिसून येत नाही. शिवाय वाढीव बिले मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

तरी सदरील सिक्युरिटी डिपॉजिट कोणीही नागरिक भरणार नसून महावितरणकडून या बाबद योग्य ती खबरदारी घ्यावी व जनतेला या संकटातून सोडवावे, अशी मागणी काकासाहेब देशमुख, शिवसेना भगूर शहरप्रमुख विक्रम सोनवणे, संजय शिंदे, भाऊसाहेब गायकवाड, आर डी साळवे, संग्राम करंजकर, सुदाम वालझाडे, उत्तम आहेर, नितीन काळे, दिनेश आर्य, धनंजय पाटील, मनोज कुवर, नितीन करंजकर, नंदू सूर्यवंशी, श्याम देशमुख, श्याम गायकवाड, किशोर राठोड, सुमित चव्हाण ,श्याम भागवत, संजय जाधव, दिलीप मोजाड, राजू जाधव यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.