वैतरणा धरण प्रकल्पातील अतिरिक्त जमीन शेतकर्‍यांना परत मिळणार

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आदेश
 वैतरणा धरण प्रकल्पातील अतिरिक्त जमीन शेतकर्‍यांना परत मिळणार
USER

घोटी । वार्ताहर Ghoti

इगतपुरी तालुक्यात ( Igatpuri Taluka ) बांधण्यात आलेल्या अप्पर वैतरणा धरणासाठी ( Vaitarna dam ) संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी पडून असलेली 623 हेक्टर अतिरिक्त जमीन स्थानिक मूळ मालक असलेल्या शेतक-यांना परत मिळणार आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Water Resources Minister Jayant Patil ) यांनी याबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत आदेश दिले आहेत.

याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात बैठक झाली या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणातील विनावापरा विना पडीत असलेल्या जमिनी मूळ मालकांना परत मिळावी या साठी आमदार हिरामण खोसकर ( MLA Hiraman Khoskar )यांनी मागणी केलेली होती.

येत्या दोन महिन्यात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहे. यावेळी इगतपुरी येथील धरण स्थिती याबाबत आढावा घेण्यात आला. अप्पर वैतरणा धरणाच्या कामासाठी अतिरिक्त जमीन एकूण 623 हेक्टर एकूण 15 गावे संपादन केलेली आहे. ही जमीन अद्यापही शासनाच्या नावावर आहे , मात्र ही जमीन स्थानिकांना देण्यात यावी प्रकल्पग्रस्तांच्या उतार्‍यावर आजही शासनाचे नाव आहे ते काढून मुळ मालक असलेल्या प्रकल्पग्रस्तानचे नाव लावण्यात यावे. अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत होती.

अतिरिक्त जमिनी प्रकल्पग्रस्त मुळ मालकांना परत मिळाव्यात अशी मागणी मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे केली होती. यासंदर्भात नुकतीच झालेल्या बैठकीत चर्चा झाली.याबाबत मंत्री महोदयांनी अनुकूलता दर्शविल्याने हा प्रश्न लवकरच निकाली निघेल.

आ. हिरामण खोसकर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com