महाविद्यालयाकडून शैक्षणिक दाखल्यासाठी अतिरिक्त शुल्क

शिष्यवृत्ती अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
महाविद्यालयाकडून शैक्षणिक दाखल्यासाठी अतिरिक्त शुल्क

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

करोनाकाळात (corona) शिक्षण (education) सुरू होते. जि. प. शाळा (school) देखील ऑनलाईन (online) चालू करून विद्यार्थी (students) शिक्षणापासून (education) वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेली. दुसरीकडे खासगी शाळांनी देखील ऑनलाईन शिक्षण (Online education) देत भरमसाठ फी वसूल (fee recovery) करण्याचा धंदा सुरू केला होता.

परंतु वाढत्या तक्रारीमुळे त्यांना फि मध्ये सवलत द्यावी लागली हे वास्तव आहे. परंतु आता काही आलबेल असतांना समाजकल्याण विभागाकडून (Department of Social Welfare) महाविद्यालयांना शिष्यवृत्ती (scholarship) जमा न झाल्याने पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (students) पुढील शिक्षणासाठी जाण्यासाठी महाविद्यालयाकडून शैक्षणिक दाखले अडविण्यात आल्याच्या तक्रारी दिंडोरीतील (dindori) विद्यार्थ्यांकडून येत आहेत. यावर त्वरित तोडगा काढून विद्यार्थ्यांचे दाखले वितरित करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

करोनासारख्या (corona) महामारीने सर्वत्र थैमान घातले होते. त्यातून सध्या झाल्याने प्रत्येकाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. सर्वच क्षेत्रात करोनामुळे नुकसान झाले. नुकतेच महाविद्यालयीन परीक्षांचा निकाल (Exam Result) लागलेला आहे. पदवीच्या प्रथम व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात (college) शिक्षण घ्यायच्या असल्याने दाखल्यांची त्यांची मागणी नाही.

त्यांचे शिक्षण चालू आहे परंतु पदवी पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची समाजकल्याण विभागांनी शिष्यवृत्ती जमा न महाविद्यालयाने अशा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दाखला अडविण्यात आला आहे. शाळेची फी भरा तरच दाखले मिळतील असा पवित्रा दिंडोरीच्या महाविद्यालयाने घेतल्याने विद्यार्थ्यांची धावपळ उडाली आहे.

गोरगरीब कुटुंबातील आदिवासी क्षेत्रातील मुले महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी आपली वाट शोधत असतांना दिंडोरीच्या महाविद्यालयाने समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती जमा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांची अडवणूक आहे. यामुळे त्यांचे पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना अडचण येणार असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी दिंडोरीतून होत आहेत. समाज कल्याण विभाग वेळेवर शिष्यवृत्ती जमा करत नसेल तर त्यात सर्वसामान्य कुटुंबातील या विद्यार्थ्यांचा काय दोष? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

जातीच्या संवर्गानुसार शिक्षणाच्या फी मध्ये सवलत मिळत आधारे गोरगरीब कुटुंबातील मुले महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतात. प्रवेश घेतेवेळी आपल्या महाविद्यालयात शिक्षणासाठी गोरगरीब मुलांना कशा सवलती आहेत याचा देखावा महाविद्यालयच्या व्यवस्थापनाकडून सांगितले जाते. असे असेल तर विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची फी साठी अशी अडवणूक करणे हे कितपत योग्य आहे?

गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असतांना त्यांना कोणी आहे की नाही? असे सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. तरी संबंधित संस्थेच्या व्यवस्थापनाने यावर त्वरित तोडगा काढत विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले वितरित करून गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी होत आहे.

समाजकल्याण विभागाने या अगोदरच असे दाखले रोखता येत नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. अतिरिक्त शुल्क न घेता त्वरित दाखले वितरित करावे याबाबत मविप्र चे नवनिर्वाचित सरचिटणीस मा नितीन ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून त्याबाबत ते योग्य निर्णय घेतील व विदयार्थ्यांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.

- नितीन बोढारे, अध्यक्ष विद्यार्थी विकास संघटना

मी मविप्र संस्थेच्या दिंडोरी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आता पुढील शिक्षणासाठी दाखला आवश्यक आहे पण माझ्याकडे 14,130 रुपयांची मागणी केली. तुझी शिष्यवृत्ती बाकी आहे असे कारण सांगितले. माझी आर्थिक परिस्थिती नसल्याने मला ही अतिरिक्त फी भरणे अशक्य आहे. तरी मला न्याय मिळावा.

- रोहन नाईकवाडे, विद्यार्थी दिंडोरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com