महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महावितरण कंपनीच्या द्वारका उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला बांधकाम व्यावसायिकाकडून वीज मिटर बसविण्याच्या मोबदल्यात १७ हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली....

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांच्या बांधकामाच्या साईटवर ४१ वीज मीटर व ट्रान्सफार्मर बसविण्याच्या कामास मंजुरी देण्याच्या मोबदल्यात संशयित संजय मारुती धालपे (४४, व्यवसाय- नोकरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण, वर्ग १, द्वारका उपविभाग नाशिक, राहणार- नाशिक ) याने (दि. २ डिसेंबर) तक्रारदार यांच्याकडे ५०० रुपये प्रति मीटर प्रमाणे ४१ मीटरचे २० हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली.

महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात
सुरगाण्यातील ग्रामस्थ विलिनीकरणावर ठाम; शिष्टमंडळ पोहोचले गुजरातला

त्यानंतर तडजोडी अंती १७ हजार रुपयांची पंच व साक्षीदारां समक्ष मागणी करून (दि. ५) १७ हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.

महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात
सप्तशृंगी गड : विश्वस्थांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक, पाहा व्हिडीओ

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिरा आदमाने, नारायण न्याहळदे, पोलीस नाईक प्रवीण महाजन, नितीन कराड, नितीन नेटारे आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com