अपर जिल्हाधिकारी करणार खदानींची पाहणी

अपर जिल्हाधिकारी करणार खदानींची पाहणी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील महत्वाच्या गौण खनिजांची चौकशी आता स्वतः अपर जिल्हाधिकारी (Collector) जातीने हजर राहून करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे (Collector Dattaprasad Nade) यांच्याकडे अनेक दिवसंपासून याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाले होत्या. त्यामुळे आता सारुळ आणि राजूर बहुला (Rajur Bahula) येथील स्टोन क्रशर (Stone crusher) आणि खदानींची (Mines) आता अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे तपासणी करणार आहेत

यामध्ये प्रामुख्याने ते जागेवर जात खाण परवानगी, गट नंबर खोदाई त्याच ठिकाणी होते का? अशा बाबींची ते शहानिशा करणार असल्याने खाण व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली आहे. मुदत संपल्यानंतरही दगडांची होणारी कटाई, होणारे क्रशिंग परवानगी दुसर्‍या गटावरची अन् खोदाई भलतीकडेच करणे, उभी डोंगरांची कत्तल, वृक्षतोड (Deforestation) करुन डोंगरे भुईसपाट करत पैशाच्या हव्यासापायी केली जाणारी निसर्गाची हानी (Damage to nature), स्टोन क्रशर, खाणींबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आता या खाणींची प्रत्यक्ष जागेवर जाऊनच तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे.

खनिकर्म करणार्‍या धारकांनी आपल्याकडील सर्व परवानग्या अन् संयुक्तिक माहिती सोबत ठेवणेही बंधनकारक आहे. तसे पत्रही क्रशरधारकांना देण्यात आल्याची माहिती गौण खनिज विभागाकडून देण्यात आली आहे. तहसीलदारांनीही या भागातील खाणींच्या परवानगीसह इतर संबंधित बाबींची अपेक्षित पुरावे, कागदपत्र घेऊन तेथे हजर राहण्याचेही आदेश जिल्हा खनिकर्म विभागाने दिले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com