करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

सिन्नर तालुक्यात नव्या ३३ रुग्णांची भर

रुग्णांची संख्या ९४६ वर

Gokul Pawar

Gokul Pawar

सिन्नर | Sinnar

सिन्नर तालुक्यात आज रोजी (दि.१८) ३३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात शहरात १२ तर ग्रामीण भागात २१ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान दिवसेंदिवस तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहेत. आज आलेल्या अहवालानुसार ३३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरात कर्पे नगर ५८ वर्षीय महिला, लोंढे गल्ली ६५ व ५० वर्षीय महिला, शिवाजी नगर ४८ वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय महिला, वृंदावन नगर ४३ वर्षीय महिला व २० वर्षीय तरुण, उद्योग भवन ५५ वर्षीय महिला व ३२ वर्षीय पुरुष, भैरवनाथ सोसायटी ३० वर्षीय पुरुष, विजय नगर ५५ वर्षीय पुरुष, एमजी नगर २४ वर्षीय महिला बाधित असल्याचा अहवाल आला आहे.

ग्रामीण भागात सोनारी ४७, ४६, ४० वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला, शिवडे ३५, ४०, ४३ वर्षीय पुरुष, वडांगळी ४० वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगी व १४ वर्षीय मुलगा, सोनांबे ४८ वर्षीय पुरुष व ४५ वर्षीय महिला, कोनांबे ४० वर्षीय महिला व २६ वर्षीय युवक, गोंदे ८१ वर्षीय पुरुष, गुळवंच ५२ वर्षीय पुरुष, ठाणगाव २८ वर्षीय युवक, वडगाव-पिंगळा २३ वर्षीय युवक, माळेगाव १३ वर्षीय मुलगा, माळेगाव एमआयडीसी ३२ वर्षीय पुरुष, जिंदाल फाटा ५० वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजच्या या ३३ रुग्णांमुळे तालुक्यातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ९४६ झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com