समको बँकेत आदर्श पॅनलची सत्ता कायम

समको बँकेत आदर्श पॅनलची सत्ता कायम
Dipak

सटाणा । प्रतिनिधी | Satana

बागलाण तालुक्याची (baglan taluka) अर्थवाहिनी समजल्या जाणार्‍या सटाणा मर्चंट को-ऑप. बँकेच्या (Satana Merchant Co-op. Bank) चुरशीच्या निवडणुकीत (election) आदर्श पॅनलने 17 पैकी 15 जागांवर दणदणीत विजय मिळवून सत्ता कायम राखली असून विरोधी सिध्दीविनायक पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

समको बँकेची निवडणूक (election) आरोप-प्रत्योरोपांनी गाजली. सिध्दीविनायक पॅनलकडून आदर्श पॅनलच्या नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडत परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, आदर्श पॅनलचे नेते रमेश देवरे, श्रीधर कोठावदे यांनी कोणत्याही आरोपाचे खंडन न करता चातूर्य व चाणाक्यनितीचा वापर करत सभासदांचा विश्वास डळमळीत न होऊ देता बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखण्याचे शिवधनुष्य पेलत सिध्दीविनायक पॅनलचा धुव्वा उडविला.

समको बँकेसाठी दि. 19 जूनरोजी मतदान (voting) झाले. त्यानंतर एका बुथवर 26 जूनरोजी फेरमतदान होऊन काल (दि. 27) सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. रात्री 10 वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती. सुरुवातीपासूनच आदर्श पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. दुपारी तीन वाजेदरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही काळ वीजपुरवठा खंडीत (Power outage) झाला होता. शेवटी निकाल जाहीर होताच मतमोजणीत सुरवातीपासुन आघाडीवर असलेल्या आदर्श पॅनलने 17 पैकी 15 जागांवर विजय मिळविला तर सिध्दिविनायक पॅनलचे केवळ 2 उमेदवार विजयी झाले.

आदर्श पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटात पंकज ततार, जयवंत येवला, कैलास येवला, स्वप्नील बागड, सचिन कोठावदे, महेश देवरे, अभिजीत सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, रमणलाल छाजेड, प्रवीण बागड, भटक्या विमुक्त जाती-जमाती गटात जगदीश मुंडावरे, इतर मागासवर्ग गटात दिलीप येवला, अनुसूचित जाती-जमाती गटात प्रकाश सोनग्रा, महिला राखीव गटात रूपाली कोठावदे, कल्पना येवला यांचा समावेश असून सिद्धिविनायक पॅनलचे डॉ. विठ्ठल येवलकर व भास्कर अमृतकर हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत.

मतमोजणीत (Counting of votes) पॅनल टू पॅनल मतदान होण्याच्या प्रमाणापेक्षा पसंतीच्या उमेदवारांना मतदान (voting) होण्याचे प्रमाण अधिक होते. दुसर्‍या फेरीत आदर्श पॅनलचे मनोज अमृतकार व सिध्दीविनायक पॅनलचे भास्कर अमृतकार यांच्यात निकराची झुंज झाली. शेवटच्या क्षणी भास्कर अमृतकार अवघ्या 7 मतांनी विजयी झाल्यामुळे सिध्दिविनायक पॅनलची एक जागा वाढली.

विजयी उमेदवारांमध्ये पंकज ततार यांना सर्वाधिक 3678 मते मिळाली, तर आदर्श पॅनलचे उमेदवार अशोक गुळेचा व मनोज अमृतकार यांचा अल्पमताने पराभव झाल्याने समर्थकांमध्ये नाराजीचा सूर होता. सिद्धिविनायक पॅनलचे नेते मयूर अलई यांचाही पराभव झाला. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आदर्श पॅनलच्या विजयी उमेदवारांनी शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

विजयी उमेदवारांनी शहरातील इतर महापुरूषांच्या पुतळ्यांनाही अभिवादन करुन देवमामलेदार यशवंतराव महाराज व महालक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देवळ्याचे सहाय्यक निबंधक सुजय पोटे यांनी काम पाहिले. त्यांना बागलाणचे सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके, शरद दराडे, अनिल पाटील, बँकेचे सरव्यवस्थापक देवीदास बागडे यांनी सहाय्य केले. पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com